पुणे विभागात ‘जलयुक्त’ची वीस हजारांवर कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान राबविण्यासाठी गेल्या वर्षी पुणे विभागातील ८२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये २० हजार ९०२ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, अपुरा निधी आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे पुणे विभागातील सोलापूर जिल्हयात या कामांना घरघर लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रस्तावित १०,४७३ कामांपैकी जूनअखेर अवघी सहा हजार म्हणजेच ६१ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून पुणे विभागातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिंमेट बंधारे, नालाबंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणासह करणे, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन करणे, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे, अशी विविध कामे करण्यात येत आहेत.

२०१६-१७ मध्ये अभियानासाठी विभागातील ८२५ गावे निवडली होती. त्यामध्ये ४९ हजार ५४३ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी ४८ हजार ६७६ कामे पूर्ण झाली असून, ८६७ कामे प्रगतिपथावर आहे. त्यावर ६७३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. २०१७-१८ मध्ये अभियानात विभागातील ८२३ गावांची निवड केली होती. या गावामध्ये एकूण २६ हजार ८५९ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी २० हजार ९०२ म्हणजेच ७८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

यंदा पुणे विभागात ५९९ गावे निवडण्यात आली आहेत. शासनाकडून १५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या गावात ‘जलयुक्त’ची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. चालू वर्षी निवडलेल्या गावांत पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर कामे केली जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  

गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली गावे, प्रस्तावित व झालेली कामे
जिल्हा  निवडलेली गावे  प्रस्तावित कामे पूर्ण झालेली कामे
पुणे   १९०  ४८२३ ४२३८
सातारा  २१० ३३९७ २१८२  
सांगली १४०   ७९५१ ७८९०
सोलापूर २६५ १०,४७३  ६४३०
कोल्हापूर  १८  २१५ १६२
एकूण ८२३ २६,८५९ २०,९०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com