औरंगाबादेत जांभूळ ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबादेत जांभूळ ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबादेत जांभूळ ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २२) जांभळाची आवक १३ क्विंटल झाली. त्यास ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १५९ क्विंटल आवक झाली. तिला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५३४ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ५०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३७ क्विंटल, तर दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १७१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

२९ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ११०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारची आवक ३५ क्विंटल, दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३३ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

भेंडीची आवक ६८ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ११० क्विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीला ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.२१ क्विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३९ क्विंटल आवक झालेल्या आंब्याला २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३० क्विंटल आवक झालेल्या पपईचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचा दर २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

१२ क्विंटल आवक झालेल्या चवळीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १०६ क्विंटल आवक झालेल्या कैरीचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३१ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आवक ७ हजार जुड्यांची झाली. तिला ७०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.

९ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com