Agriculture news in Marathi Jamkhed municipality should knocked lock the market committee | Agrowon

जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला १७ लाख रुपयांच्या थकीत वसुलीसाठी टाळे ठोकले. करवसुलीसाठी पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

जामखेड शहरात नगरपरिषद प्रशासनाची करवसुली जोरात सुरू आहे. थकबाकीदारांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपरिषदेने सक्तीची वसुली सुरू केली आहे. पहिलीच कारवाई बाजार समितीवर झाली. 

जामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला १७ लाख रुपयांच्या थकीत वसुलीसाठी टाळे ठोकले. करवसुलीसाठी पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

जामखेड शहरात नगरपरिषद प्रशासनाची करवसुली जोरात सुरू आहे. थकबाकीदारांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपरिषदेने सक्तीची वसुली सुरू केली आहे. पहिलीच कारवाई बाजार समितीवर झाली. 

या वेळी कार्यालयीन निरीक्षक विष्णू भिसे, करनिरीक्षक रामराव नवगिरे, रज्जाक शेख, अभिजित भैसडे, प्रमोद टेकाळे, सुग्रीव फुंदे, पी. व्ही. नरवडे, अतुल राळेभात, शंकर देशमुख, हितेश वीर, अविनाश साबळे, रामेश्वर नेटके, राजेंद्र गायकवाड, वलीभाई शेख, संजय खेत्रे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. 

नगरपरिषद प्रशासनाने १७ लाख ३५ हजार ४३४ रुपये कराच्या थकबाकीबाबत बाजार समितीकडे वेळोवेळी तगादे व मागणी बिल पाठवूही बाजार समितीने रक्कम भरली नाही. ही रक्कम सरळमार्गी वसूल होत नसल्याची खात्री झाल्यावर, शेवटची संधी म्हणून २७ नोव्हेंबर रोजी सर्व थकबाकी भरण्यासाठी नगरपरिषदेने अंतिम नोटीस बजावली. त्यासाठी तीन डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. 

या मुदतीत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे तीत बजावले होते. त्यानुसार कारवाईच्या तीन तास अगोदर बाजार समितीला तशी नोटीस बजावली होती. दरम्यान, ही कारवाई राजकीय आकसातून केल्याची चर्चा आहे. 

नगरपरिषदेची मनमानी
कृषी उत्पन्न बाजार समितीने नगरपरिषदेच्या नोटिशीला उत्तरादाखल पत्र देऊन, ‘थकबाकीवर लावलेला २४ टक्के दंडव्याज माफ करावे, नगरपरिषदेकडून साफसफाई, पाणी, आरोग्य आदी कोणत्याही सुविधा बाजार समितीला मिळत नाहीत. आम्ही बाजार समितीच्या थकीत मालमत्ता करापैकी दोन लाख रुपयांचा धनादेश देऊ केला; मात्र, नगरपरिषदेने पाच लाख रुपये भरण्यास सांगितले,’ असे म्हटले आहे. यावर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा विचारविनिमय सुरू होता. त्या दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने कार्यालयाला टाळे ठोकले. नगरपरिषद मनमानी करीत असल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांनी केला आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...