शेतकरी, शेतमजुरांना न्याय न मिळाल्यास जनआंदोलन ः किसान सभा

नाशिक : कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतीमाल विक्रीत अडचणी, त्यातच पीक कर्ज मिळत नाही. शेतमजुरांना काम नाही. सरकारने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास शेतकरी-शेतमजूर हक्क जनआंदोलन उभारण्यात येईल : किसान सभा
Jan Andolan: Kisan Sabha if farmers do not get justice
Jan Andolan: Kisan Sabha if farmers do not get justice

नाशिक : कोरोना महामारीमुळे संकट शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगारांवर ओढवले आहे. बाजारपेठा बंद असल्याने शेतीमाल विक्रीत अडचणी, त्यातच पीक कर्ज मिळत नाही. शेतमजुरांना काम नाही. सरकारने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास शेतकरी-शेतमजूर हक्क जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. 

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे, की नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. आता शेतकरी व शेतमजूर अडचणीत असताना न्याय मिळत नसल्याने व्यापक जनआंदोलना शिवाय पर्यायच उरला नसल्याचे सांगण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, कार्याध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे, जिल्हा सचिव देविदास भोपळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

करण्यात आलेल्या मागण्या 

  • कोरोना काळात शेती आणि शेतकरी विरोधात काढलेले सर्व आदेश ताबडतोब मागे घेण्यात यावे 
  • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतकऱ्यांना पीककर्ज, खते त्वरीत उपलब्ध करून घ्या 
  • शेतकरी, सर्व जनतेचे कोरोना काळातील वीज बिल माफ करा 
  • अन्नसुरक्षा कायद्याची सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत हमी निर्माण करा 
  • शेतकरी शेतमजूर व कारागिर यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या 
  • सोयाबीन, धान आणि इतर खरीप पिकांचे हमीभावात वाढ करा 
  • मनरेगाच्या कामात शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश करा. 
  • मजुरांना प्रति व्यक्ती ३०० दिवसांसह ३०० रुपये प्रतिदिवस मजुरी द्या. 
  • शेतमजुरांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा देणारे मंडळ स्थापन करा. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com