जानोरी गावाचा ‘स्मार्ट जलग्राम’ योजनेत समावेश

दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशनअंतर्गत टाटा कंपनीने निवड केली आहे. या गावात ‘स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट’ योजना राबविण्यात येत आहे. सह्याद्री फार्मस क्लस्टरअंतर्गत जानोरी गावाचा सहभाग आहे.
Janori village included in 'Smart Jalgram' scheme
Janori village included in 'Smart Jalgram' scheme

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशनअंतर्गत टाटा कंपनीने निवड केली आहे. या गावात ‘स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट’ योजना राबविण्यात येत आहे. सह्याद्री फार्मस क्लस्टरअंतर्गत जानोरी गावाचा सहभाग आहे. देशभरातील एकूण सहा गावांची निवड यासाठी करण्यात आली होती. यातील महाराष्ट्रातील एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे.

सुरुवातीला टाटा ट्रस्ट, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानोरी ग्रामपंचायत या चारही संस्थांनी गावाची पाहणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जानोरी ग्रामपंचायत गावासाठी दररोज किती पाणी घेते व ते पाणी किती शुद्ध आहे. गावाला तेवढे पाणी जाते का नाही? हे या मीटरद्वारे व सेन्सरमुळे समजणार आहे. त्यामुळे गावाची पाण्याची बचत पण होणार आहे. ही योजना जानोरी गावात यशस्वी झाली तर महाराष्ट्रात नव्हे तर, पूर्ण भारतात टाटा कंपनी ही योजना राबविणार आहे.

ही योजना यशस्वी करण्यासाठी टाटा कंपनीचे प्रणय सिन्हा, विश्वजीत दत्ता, गिरीश बी. टी, शशांक रेड्डी, व्यंकटेश आर्वे, सह्याद्री कंपनीचे संचालक विलास शिंदे, सुरेश नखाते, तेजस पिंगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महुआ बॅनर्जी, टाटा कंपनीचे मॅनेजर संदीप शिंदे, मनीष सिंग, जानोरी सरपंच संगीताताई सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, ग्रामसेवक केके पवार, पाणीपुरवठा कर्मचारी सुनील बोस, योगेश रोंगटे आधी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.

केंद्र सरकरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पायलट प्रोजेक्ट युनिट जानोरी येथे कार्यान्वित करण्यात आले. या प्रकल्पामुळे प्रत्येक घरात किती पाणी येते व त्याची शुद्धता किती हे एका क्लिकवर समजणार आहे. या साठी टाटा उद्योग समूहाने पायलट प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. - विलास शिंदे, संचालक, सह्याद्री फार्म्स.

गावात जल जीवन मिशनअंतर्गत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना राबवण्यासाठी अतिशय आनंद झाला आहे. योजना करण्यासाठी गावकऱ्यांनी अतिशय मदत केली आहे. - प्रणय सिन्हा, टाटा ट्रस्ट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com