माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

स्वतंत्र लढण्याची चूक परत करणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

अकोला : २०१४ च्या निवडणुकीत अाम्ही स्वतंत्र लढण्याची चूक केली. या वेळी मात्र विविध समविचारी पक्षांशी चर्चा करून अातापासूनच तयारी सुरू केली अाहे. एकत्रितपणे निवडणूक लढणार अाहोत. गेल्यावेळी केलेली चूक परत करणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिले.

अकोला येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात जनसंघर्ष यात्रेनिमित्ताने शुक्रवारी (ता. ७) आयोजित जाहीर सभेत श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, वसंतराव पुरके आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, की तेव्हाच्या युपीए सरकारवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे अारोप करून भाजप सरकार सत्तेत अाले. मात्र त्यांनी केलेल्या अारोपांचा एकही पुरावा सत्तेत असताना न्यायालयापुढे सादर केला नाही. याचाच अर्थ ते अारोप खोटे होते हे सिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला विविध अाश्वासने दिली. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की भारत देश हा संविधानाच्या तत्त्वावर चालणारा आहे. परंतु भाजपला या देशाला मनूच्या घटनेवर न्यायचे असून काँग्रेस ते कदापि होऊ देणार नाही.

विखे पाटील म्हणाले, की राज्य सरकारमध्ये गोंधळाची स्थिती अाहे. अनेक मंत्री भ्रष्टाचारी अाहेत. अाम्ही पुरावे दिले. परंतु मुख्यमंत्री फडणवीस याबाबत गप्प राहतात. देशात अाणि राज्यात ‘इव्हेंट’ सरकार कार्यरत अाहेत. शेतकरी अात्महत्या करीत अाहे, शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध रोष वाढत असताना सरकार मात्र काहीही करायला तयार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com