Agriculture news in marathi The jar of birds has grown at Darganhalli | Agrowon

दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा किलबिलाट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येई. परंतु, सध्या वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे अनेक पक्षी पाहण्यात येत नाहीत. यामुळे पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत नाही. पक्ष्यांचा किलबिलाट कायम ऐकिवात येण्याकरिता दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तरुण सोमनाथ बिराजदार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सोमनाथ यांच्या प्रयत्नांनी अनेक चिमण्या येत आहेत.

सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास येई. परंतु, सध्या वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे अनेक पक्षी पाहण्यात येत नाहीत. यामुळे पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत नाही. पक्ष्यांचा किलबिलाट कायम ऐकिवात येण्याकरिता दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तरुण सोमनाथ बिराजदार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सोमनाथ यांच्या प्रयत्नांनी अनेक चिमण्या येत आहेत.

उन्हाळ्यात पक्ष्यांच्या सोयीसाठी सोमनाथ यांनी आपल्या हॉटेलसमोर चारा-पाण्यासह गवताच्या वेलीचा मांडव उभा केला. त्या मांडवावर पाणी आणि धान्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या अडकविल्या. तसेच, संध्याकाळी पक्ष्यांना निवाऱ्यासाठी त्यांच्या शेतातील घरटी आणून मांडवावर अडकल्याने पक्षी निवारा घेत आहेत. सोमनाथ यांनी पक्ष्यांना लळा लावल्याने त्यांच्या हॉटेलसमोर रोज सकाळी पक्ष्यांची शाळा भरते. 

येथे रोज सकाळी १५ ते २० विविध जातीचे पक्षी येत आहेत. त्यात चिमणी, बुलबुल, सनबर्ड, शिंपी, कोकिळा, धोबी आणि साळुंकी या पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजून जात आहे. सोमनाथ यांनी परिसरासमोर छोटीशी बाग तयार केली आहे. या बागेत त्यांनी विविध जातीच्या शोभिवंत फुलांच्या झाडांची लागवड केली आहे. हिरवी कंच झाडी पाहून पक्षीही या परिसराकडे आकर्षित होतात.
 


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...