Agriculture news in marathi, Jat border will provide water to Karnataka: Amit Shah | Agrowon

जत सीमा भागाला कर्नाटकातून पाणी देणार : अमित शहा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

जत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या सीमावर्ती भागाला कर्नाटकातून पाणी देण्याची योजना लवकरच होईल. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कनार्टकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे’’, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. 

जत येथे भाजप उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचार सभेत शहा बोलत होते. खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. 

जत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या सीमावर्ती भागाला कर्नाटकातून पाणी देण्याची योजना लवकरच होईल. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कनार्टकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे’’, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. 

जत येथे भाजप उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचार सभेत शहा बोलत होते. खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप उपस्थित होते. 

जत तालुक्‍यातील सीमावर्ती ४२ गावांना कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याचा विषय चर्चेत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमधील समन्वयाअभावी गेल्या काही वर्षांपासून हा विषय पुढे गेला नाही. त्या मुद्याला शहा यांनी हात घातला. 

 शहा म्हणाले, "सांगलीच्या जनतेने आम्हाला ताकद दिली आहे. आम्ही तुमचे प्रश्‍न सोडवणार आहोत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ४ हजार ९६० कोटींची सुधारित मान्यता आम्ही दिली आहे. आता कर्नाटकातून पाणी देण्याचा विषयही लवकरच मार्गी लागेल.''

"इस्लामपूरला टेक्‍सटाईल पार्क, सांगलीत बसपोर्ट, कवठेमहांकाळला ड्रायपोर्ट असा विकासाचा धडाका आम्ही लावला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देऊन मोदींनी तुमच्या कष्टाला हातभार लावला आहे,'' असेही शहा यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...