दुष्काळ जाहीर केला; सवलतींची अंमलबजावणी कधी

दुष्काळ जाहीर केला; सवलतींची अंमलबजावणी कधी
दुष्काळ जाहीर केला; सवलतींची अंमलबजावणी कधी

सांगली : जत तालुक्‍यात भीषण पाणीटंचाईचे दाहक चटके लोकांना बसू लागले आहेत. दुष्काळ जाहीर झाला सवलती कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे. सवलती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे. जत तालुक्‍यात पावसाळ्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. यामुळे आतापासूनच तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यासंबंधी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तर प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. लोकप्रतिनिधी याकडे दुर्क्षल करत असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात रब्बी हंगामातील ७० गावांची पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही. रब्बी पूर्णपणे वाया गेलेला आहे. असे असतानासुद्धा दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून पुरेशी मदत होत नाही. यासाठी कोणी पाठपुरावादेखील करीत नाही. शासनाच्या कारभारामुळे दुष्काळी ७० गावांना मदतीपासून वंचित राहावे लागणार काय, असा सवाल केला जातो आहे. ऑक्‍टोबरमधील आणेवारीनुसार खरीप हंगामातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. यामुळे शासनाने या सर्वंच गावांत दुष्काळ जाहीर केला आहे. खरे तर खरीप व रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. पिण्याचे पाणी, चाराटंचाई गंभीर झाली आहे. रब्बी पिकांची तर पेरणीच झालेली नाही. काही भागात ३० टक्के जेमतेम पेरणी झाली होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने १५ दिवसांतच कोवळी पिके करपून गेली. दुष्काळी परिस्थिती आहे त्या गावात पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. चाराटंचाई आहे. तरीदेखील या रब्बी हंगामातील गावांत दुष्काळ जाहीर करायला दिरंगाई केली जात आहे.

जत तालुका दृष्टीक्षेपात...

  • तालुक्‍यात महसूली  :  १२३ गावे
  • तालुक्‍याचे क्षेत्रफळ  :  २ लाख २४ हजार ८२४ हेक्‍टर
  • लागवडीखालील क्षेत्र  :   १ लाख ५८ हजार ७०० हेक्‍टर
  • खरीप क्षेत्र : ६५ हजार ७०० हेक्‍टर,
  • रब्बी क्षेत्र : ९३ लाख ३०० हेक्‍टर
  • मुलकी पड क्षेत्र  : १ हजार ९७० हेक्‍टर
  • बागायत एकूण क्षेत्र  : २२ हजार ७५ हेक्‍टर,
  • तर जिरायत क्षेत्र : ६२ हजार २९९ हेक्‍टर
  • वार्षिक सरासरी पर्जन्यमान : ४२७.५ मि.मी.
  • ज्वारी, बाजरी, मका व कडधान्य आदी प्रमुख पिके आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com