agriculture news in Marathi, In Jat taluka, grape and pomegranate gardens have been burnt down | Agrowon

जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा गेल्या वाळून
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी व खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी द्राक्ष आणि डाळिंब बागा वाळून गेल्या आहेत. सर्वत्र विदारक चित्र आहे. दुष्काळाचा परिणाम सर्वच घटकावर झाला आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावेच्या गावे ओस पडली आहेत. पुढील तीन महिने कसे काढायचे, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. 

सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी व खरीप दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी द्राक्ष आणि डाळिंब बागा वाळून गेल्या आहेत. सर्वत्र विदारक चित्र आहे. दुष्काळाचा परिणाम सर्वच घटकावर झाला आहे. पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावेच्या गावे ओस पडली आहेत. पुढील तीन महिने कसे काढायचे, असा प्रश्न दुष्काळग्रस्तांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. 

पश्‍चिम भागात कमी झळा
जत तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाल्याने या भागात यंदा पाणीटंचाईच्या झळा कमी बसल्या आहेत. जत उत्तर, दक्षिण व पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईस सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत चालली आहे. विशेषतः पूर्व भागात वाढती मागणी आहे. ४२ गावांचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे. या ४२ गावात ना कर्नाटकातून पाणी आले ना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पोचले. त्यामुळे जनता पाण्यासाठी टाहो फोडताना दिसते आहे. 

कर्जाची शेतकऱ्यांना चिंता...
जत तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब पिके घेतली जातात. परंतु पावसाची अवकृपा, आणि भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. द्राक्ष आणि डाळिंबाच्या हंगामापासून टॅंकरने पाणी देवून बागा जगविल्या आहेत. मात्र, आता पाणीटंचाई इतकी गडद झाली आहे, की टॅंकरने पाणी देणे मुश्कील झाले आहे. पाणी मिळत नसल्याने बागा वाळू गेल्या आहेत.

चाऱ्याचा प्रचंड तुटवडा 
पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रचंड तुटवडा जानवू लागला आहे. जत तालुक्यात २ लाखांहून अधिक जिनावरे आहेत. रब्बी आणि खरीप हंगाम वाया गेल्याने चारा मिळत नसल्याने पशुपालकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने पशुपालकांनी केली आहे. मात्र, चारा छावण्या सुरू करण्याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या नाहीत.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...