जत तालुक्यात द्राक्षबागांची खरड छाटणी रखडली

जत तालुक्यात द्राक्षबागांची खरड छाटणी रखडली
जत तालुक्यात द्राक्षबागांची खरड छाटणी रखडली

सांगली ः जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रखडली आहेत. परिणामी या वर्षी द्राक्ष उत्पादनात घट होणार असून, बागायतदार आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड अशा फोंड्या माळरानावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधून द्राक्षबागा जगविण्याची धडपड शेतकरी करत आहेत. बागांची खरड छाटणी घेऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही, तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही.

मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकरी द्राक्षबागांना टँकरने पाणी घालत आहेत. परंतु टँकर भरण्यालासुद्धा पाणी मिळेनासे झाले आहे.

पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही. पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे. - विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com