Agriculture news in marathi Jat taluka will be tanker free this year | Agrowon

जत तालुका यंदा होणार टॅंकरमुक्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

जत तालुक्‍यात पश्‍चिम व उत्तर भागातील दहा तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाल्याने व परतीच्या पावसाने पूर्व भागाला दिलासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा  जत तालुक्‍यात टॅंकरमुक्त चित्र निर्माण झाले आहे.

सांगली (प्रतिनिधी) : जत तालुक्‍यात पश्‍चिम व उत्तर भागातील दहा तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाल्याने व परतीच्या पावसाने पूर्व भागाला दिलासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात कायम दुष्काळी समजल्या जाण्याऱ्या जत तालुक्‍यात टॅंकरमुक्त चित्र निर्माण झाले आहे.

तालुक्‍यातील २८ पैकी १४ तलाव शंभर टक्के भरले आहेत. संख व दोड्डनाला हे दोन मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने परिसरातील हजारो एकर शेती ओलिताखाली येणार आहे. तसेच म्हैसाळ योजनेमुळे अनेक तलाव भरले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागाला यंदा पाणी टंचाई भासणार नाही.

तालुक्यातील गतवर्षी बारा पाणलोट क्षेत्रापैकी नऊ ठिकाणी शोषित, अतिशोषित व अंशत: शोषित भाग म्हणून भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले होते. १०५ गावांमध्ये पाणी पातळी झपाट्याने घटल्याने तालुक्‍यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासह शासनाने या ठिकाणी वैयक्तीक विहिरी व बोअर पाडण्यात मनाई केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. मात्र, यंदा परतीच्या पावसाने जवळपास पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

प्रशासनाला टॅंकरवर करावा लागणार अतिरिक्त खर्च थांबला आहे. तर पूर्व भागातील तिकोंडी व अंकलगी तसेच दक्षिणेकडे असलेल्या बिळूर के. गुगवाड, उमराणी व खोजनवाडी या तलावात म्हैसाळचे पाणी दाखल होत नसल्याने व पावसाचे प्रमाण ही कमी असल्याने म्हणावा असा पाणीसाठा होऊ शकला नाही. सध्या हे तलाव 
मृतावस्थेत आहेत.

पूर्ण क्षमतेने भरलेले तलाव
संख मध्यम प्रकल्प, सिद्धनाथ, सोरडी, तिकोंडी (२), भिवर्गी, पांडोझरी, बेळुंखी, दोड्डनाला मध्यम प्रकल्प, येळवी, मिरवाड, रेवनाळ, वाळेखिंडी, शेगाव (१), बिरनाळ, आदी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

सिंचनासाठी अपेक्षीत क्षेत्र...
तालुक्‍यात पाटबंधारे विभागाकडे जत व संख दोन्ही शाखेकडे मिळून दोड्डनाला व संख हे दोन मध्यम प्रकल्प व २६ लघु पाटबंधारे तलाव आहेत. यामध्ये प्रशासनाकडून १५ हजार २७१ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आण्याण्याचा उद्दिष्ठे आहे. यंदाच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने जवळपास वरिल उद्दिष्ठपैकी निम्याहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे.

प्रशासनावर टॅंकरचा भार कमी...
जत तालुक्‍यात १२५ गाव तर १३७ वाड्यावस्त्या आहेत. त्यामध्ये ७० गावे व १०० वाड्यावस्त्यांवर उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. तालुक्‍यातील या गावांत पाण्यासाठी कायम नागरिकांची भटकंती सुरू असते. प्रशासनाच्या आकडेवारी नुसार उन्हाळ्यात किमान १५० रोज टॅंकरने पाणी या गावांना पुरवले जाते. त्यावर प्रचंड खर्चही येतो. मात्र यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे टॅंकरचा भार कमी होणार आहे.

  •  तालुक्‍यात २८ पैकी १४ तलाव पूर्ण भरले
  •  संख, दोड्डनाल प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
  •  हजारो एकर शेती पाण्याखाली येणार
  •  १०५ गावांची पाणी पातळी वाढली
  •  दुष्काळी तालुका टॅंकरमुक्त होणार

प्रतिक्रिया
गेल्या चार ते पाच वर्षांच्या सरासरीत यंदा पावसाने दिलासा मिळाला आहे. पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरवर्षी पेक्षा यंदा प्रशासनावर टॅंकरचा भार कमी होणार आहे.
- सचिन पाटील, तहसीलदार, जत


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...