नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी पीक प्रात्यक्षिक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा अभियान योजनेतून भरडधान्य उत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १२३० हेक्टरवर ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक केले जात आहे. त्यासाठी ७३ लाख ८० हजार रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. 

जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने ज्वारीच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी योजना राबवली जाते. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा अभियान योजनेतून भरडधान्य उत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानाअंतर्गत १२३० हेक्टरवर ज्वारीचे पीक प्रात्यक्षिक घेतले जात असून त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग अनुदान देत आहे.

यासाठी शंभर हेक्टर क्षेत्राचा एक गट असेल. योजनेतून शेतकऱ्यांना प्रति १० किलो बियाणे, २.५ मिली सूक्ष्म मूलद्रव्ये, पंधरा किलो सल्फर आदी निविष्ठा दिल्या जाणार आहेत. या सर्व बाबींवर प्रतिहेक्‍टरी हजार रुपये खर्च होणार असून, शासनामार्फत त्याचे अनुदान दिले जाणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी बहुतांशी बियाण्यांचे वाटप करण्यात आले असून पेरणी सुरू असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकातून केलेल्या नियोजनामुळे ज्वारी उत्पादनात नक्की वाढ होते, असे कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने ज्वारी उत्पादनवाढीसाठी विशेष उपक्रम राबवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.  तालुकानिहाय पीक प्रात्यक्षिक क्षेत्र (हेक्टर) ः नगर  १००,पारनेर १००, पाथर्डी ८०, कर्जत १५०, जामखेड १५०,श्रीगोंदा १००, श्रीरामपूर १००, राहुरी ५०, नेवासा १५०, शेवगाव १००, संगमनेर ५०, राहाता १००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com