agriculture news in marathi, Jayakwadi to get water from Nagar_Nashik Dams | Agrowon

नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे आदेश
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सोमवारी (ता. २२) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिले. त्यामुळे मराठवाड्याला वरील धरणांतील पाणी मिळणार आहे. नाशिक, नगर जिल्ह्यांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या मुद्यावर राजकारण तापलेले असतानाच प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मराठवाड्याची तहान भागणार आहे. 

मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सोमवारी (ता. २२) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिले. त्यामुळे मराठवाड्याला वरील धरणांतील पाणी मिळणार आहे. नाशिक, नगर जिल्ह्यांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या मुद्यावर राजकारण तापलेले असतानाच प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मराठवाड्याची तहान भागणार आहे. 

राज्यातील कोणत्याही धरणातून पाणी सोडताना प्रकल्पातील क्षमतेच्या ३० ते ३५ टक्‍के पाण्याची गळती किंवा नासाडी होते. धरणातून पाणी सोडताना ही गळती ग्राह्य धरावी, असे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र गळतीव्यतिरिक्‍त एकूण साठवण क्षमतेचा विचार करून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचा रोष कमी होईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे. यासंदर्भात महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक येथे झाली. समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार १५ ऑक्‍टोबरला धरणातील पाणीसाठा तपासला जातो. या पार्श्‍वभूमीवर सध्या जायकवाडी धरणात ६५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी साठा आहे. म्हणजेच पाणी वाटपाच्या सूत्रानुसार सात टीएमसी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे नाशिक, नगर जिल्ह्यांतून पाणी सोडण्याची मराठवाड्याची मागणी आहे. यासंदर्भात गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपत्ती प्राधिकरणाकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर पाण्याची नासाडी ग्राह्य न धरता पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने महामंडळाला दिल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे.

महामंडळाला काही शंका होत्या. त्यांचे निरसन प्राधिकरणाने केले आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे, याचे सर्वाधिकार कार्यकारी संचालकांना आहेत. पिण्यासाठी, शेती आणि उद्योगांच्या पाण्याचे नियोजन त्यांनी करावे. वाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडण्याचे त्यांना आदेश दिले आहेत.
- के. पी. बक्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण.

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...