जायकवाडी तुडूंब होण्याच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद : तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावरील जायकवाडी प्रकल्पाचे ८ दरवाजे बुधवारी (ता. ९) सकाळी पुन्हा अर्धा फूटाने उघडून एक फूट करण्यात आले. तर, दहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडलेले होते.
 Jayakwadi near to overflow
Jayakwadi near to overflow

औरंगाबाद : तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावरील जायकवाडी प्रकल्पाचे ८ दरवाजे बुधवारी (ता. ९) सकाळी पुन्हा अर्धा फूटाने उघडून एक फूट करण्यात आले. तर, दहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडलेले होते. डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग घटविण्यात आला. मात्र, आवक वाढल्याने कालवे, गेट व जलविद्युत प्रकल्प मिळून पाण्याच्या एकूण विसर्गात वाढ करण्यात आली. बुधवारी (ता.९) सकाळी ८.३० वाजता जवळपास १६ हजार ७१३ क्यूसेकने प्रकल्पातून विसर्ग सुरू होता.

जायकवाडी धरणामधून बुधवारी  सकाळी ६ वाजता विविध १८ दरवाजांमधून ९४३२ क्युसेकने विसर्ग सुरू होता.  सकाळी ८ ते ८:३० वाजता दरवाजे क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३ अर्धा फूट उंचीवरुन एक फूट करण्यात आले. ४१९२ क्यूसेक विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात आला. तर, दहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. त्यामध्ये दरवाजा क्रमांक १२,  २५, ११, २६, १३,  २४, १५, २२, १७, २० चा समावेश होता. सर्व गेटमधून  १३६२४ क्यूसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्यूसेक असा एकुण १५२१३  क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु होता. 

मंगळवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता जायकवाडीतून गोदावरीच्या पात्रात १८ दरवाजांमधून ९४३२ क्यूसेक व जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेक असा एकुण ११०२१ क्यूसेक विसर्ग होता. बुधवारी प्रकल्पात पाण्याची आवक १८४२० क्युसेकने सुरू होती. त्यावेळी प्रकल्पातील  एकूण पाणी साठा २८८६.३३३ दलघमी, तर उपयुक्त पाणी २१४८.२४७ दलघमी अर्थात ९८.९५ टक्के होता. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून १२०० वरून ९०० क्युसेक विसर्ग करण्यात आला.  

डाव्या कालव्याचा विसर्ग ९०० क्विसेकवर

मंगळवारी डाव्या कालव्यातून सुरुवातीला १०० क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग नंतर ५०० व नंतर १२०० क्युसेक करण्यात आला. तो घटवून ९०० क्यूसेकवर आणण्यात आला. तर, उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्सने सुरू असलेला विसर्ग ६०० क्युसेकने सुरु होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com