जायकवाडीचा पाणीसाठा अखेर 'प्लस'मध्ये !

जायकवाडीचा पाणीसाठा 'प्लस'मध्ये
जायकवाडीचा पाणीसाठा 'प्लस'मध्ये

औरंगाबाद : नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गानंतर बुधवारी (ता. ३१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २६.२२ टीएमसीवर पोचला. ०.२२ टीएमसीने पाणीसाठा प्लसमध्ये गेला. त्या वेळी धरणांत ४५,४१८ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती.  मंगळवारी (ता. ३०) रात्री दहा वाजताच्या सुमारास जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा -३.६४ इतका होता. बुधवारी (ता. ३१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व भागातील प्रकल्पांतून होणाऱ्या विसर्गामुळे ४२ हजार ४६९ क्‍युसेक पाण्याची आवक सुरू होती. रात्रीतून जवळपास पावणेदोन टक्के पाणीसाठ्यात वाढ झाल्याने जायकवाडीतील पाणीसाठा जिवंत होण्यासाठी केवळ १.८५ टक्केच पाणी येण्याची गरज उरली होती.  बुधवारी सकाळी ७ वाजताच्या आकडेवारीनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा ६९७.८५३ दलघमी अर्थात २४.६४ टीएमसीवर पोचला होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा पाणीसाठा ७३३.३०६ दलघमी अर्थात २५.८९ टीएमसीवर पोचला होता. १०२ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्याची क्षमता २६ टीएमसी इतकी आहे. उर्ध्व भागातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून प्रकल्पातून मंगळवारी सुरू असलेला ५८ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी आपला परिणाम दाखवणे सुरू केले.  सकाळी ११ वाजताच्या सुमारास ५१५१० क्‍युसेकने जायकवाडीत पाण्याची आवक सुरू होती. तर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यामध्ये किंचित घट होऊन ती आवक ४७२४६ क्‍युसेकवर आली होती. परंतु औरंगाबाद जिल्ह्याच्या नगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील कायगाव टोका परिसरातील गोदापात्रातून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.  बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ४७ हजार २४६ क्‍युसेकने सुरू असलेला पाण्याचा येवा चार वाजेच्या सुमारास काही प्रमाणात कमी होवून ४५,४१८ क्‍युसेक झाला.  जायकवाड़ी धरण (रात्री ८ वाजताचीस्थिती)

1) जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी:-  1495.01फुट (455.680मी.) 2) आवक :- 45082 क्युसेक 3) 1 जून पासून एकुण आवक :- 261.339दलघमी  4) एकूण पाणी साठा:- 760.949दलघमी 5) जीवंत पाणी साठा:- 22.843दलघमी 6) धरणाची टक्केवारी:- 1.05%

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com