जायकवाडीचा मृत साठा १८ टीएमसीवर

जायकवाडीचा मृत साठा १८ टीएमसीवर
जायकवाडीचा मृत साठा १८ टीएमसीवर

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा १८.७० टीएमसीवर (५२९.७२ दलघमी) आला आहे. यंदा जवळपास २२ मार्चपासून जायकवाडी प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नाशिक, नगर जिल्ह्यातील पावसामुळे आता उध्‌र्व भागातील प्रकल्पातून पाणी येण्यास कधी सुरवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जायकवाडी प्रकल्पाची क्षमता १०२ टीएमसी आहे. सततच्या दुष्काळामुळे अपवादात्मक स्थितीतच प्रकल्प तुडुंब झाल्याचा इतिहास आहे. ९ जुलैला सकाळी ७ वाजताच्या स्थितीनुसार जायकवाडी प्रकल्पाची सद्याची पाणीपातळी ५२९.७२ दलघमी अर्थात १८.७० टीएमसी इतकी होती. प्राप्त माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पाचा जिवंत पाणीसाठा ७६ टीएमसी, तर मृत पाणीसाठा २६ टीएमसी गणला जातो. २२ मार्चपासून जायकवाडी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून पाणीउपसा सुरू आहे. आजअखेरपर्यंत प्रकल्पाच्या मृत साठ्यातून जवळपास २०८.३८६ दलघमी अर्थात ७.३५ टीएमसी पाणीसाठा उपसला गेला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्याचा टक्‍का उणे ९.५९ वर आहे. 

गोदावरी पात्रातून पाणी नाशिक भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे गोदावरी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने नागमठाणवरून पाणी येत आहे. मंगळवारी (ता. ९) येथून जवळपास ५ हजार क्‍युसेसने पाणी सुरू होते. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका शिवारात गोदावरी नदीपात्रात अतिशय संथ गतीने जायकवाडीच्या दिशेने झेपावत असलेले पाणी पाहावयास मिळाले.   

गाळ काढण्याची प्रतीक्षा  महाकाय अशा जायकवाडी प्रकल्पात गाळ काढण्याची प्रतीक्षा कायम आहे. जवळपास चाळीस वर्षापासून प्रकल्पातील गाळ काढलाच गेला नसल्याचे जाणकार सांगतात. गृहीतकानुसार दरवर्षी किमान १ टक्‍का गाळ पाण्यासोबत येतो. हे प्रमाण मानले, तरी जायकवाडीत किमान ४० टक्‍के गाळ साचला असण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पातील गाळ काढण्याची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com