agriculture news in marathi, Jayant Patil declared as Nationalist Party's state president | Agrowon

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. 

माजी विधानसभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी अर्थमंत्री जयंत पाटील , शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात सुरु झाली.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह एक हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल...पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव...
अंत्योदय, ‘प्राधान्य कुटुंब’...मुंबई: राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल...
सोलापूर बाजार समितीत गुरुवारीच होणार...सोलापूर : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी...
सातारा जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री...सातारा : ‘कोरोना’मुळे देशात २१ दिवसांचा...
विनाअनुदान गॅस ६२ रुपयांनी स्वस्तनवी दिल्ली : लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक...
रेशनकार्डवर तीन महिन्यांचे धान्याचे...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वऱ्हाडात पावसाने पिकांसह घरांचे नुकसान अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही...
पुणे जिल्ह्यात नागरिकांना रेशनकार्डवर...पुणे  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
नागलवाडी येथे भाजीपाला झाला जनावरांचे...गिरणारे, नाशिक : साडेचार एकर शेतातील काढणीस आलेले...
राज्यात शेतीपंपासाठीच्या वीज दरात एक...मुंबई : नेहमीच वीज दरवाढीचा बोजा सहन करणाऱ्या...
कोल्हापुरात मजूराला प्रवासास परवानगी...कोल्हापूर  ः कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सलग...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २६...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
व्यवस्थापन फळे,भाजीपाला पिकांचेकाही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची...
कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा...मुंबई : सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा...
 ‘कोरोना’च्या लढ्यासाठी अशोक चव्हाण...नांदेड ः आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत...
परतूर परिसरात लॉकडाऊनमुळे टरबूज...परतूर, जि. जालना : परतूरसह परिसरातील टरबूज...
नागपूरात शेतकरी २४ ठिकाणी करणार थेट...नागपूर ः महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट)...
पुण्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...