agriculture news in Marathi jayant patil says planning for fund and time for irrigation project Maharashtra | Agrowon

सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी, वेळेचे नियोजन करा ः जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात योग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊन सिंचन क्षमतेत वाढ होईल, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २४) दिले.

मंत्रालयात विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू व विभागाचे प्रधान सचिव इ.सिं. चहल, सचिव लाभक्षेत्र राजेंद्र पवार, सचिव प्रकल्प समन्वयक संजय घाणेकर आदी उपस्थित होते.

मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात योग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊन सिंचन क्षमतेत वाढ होईल, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २४) दिले.

मंत्रालयात विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू व विभागाचे प्रधान सचिव इ.सिं. चहल, सचिव लाभक्षेत्र राजेंद्र पवार, सचिव प्रकल्प समन्वयक संजय घाणेकर आदी उपस्थित होते.

राज्यातील निर्मित सिंचन क्षमता जून २०१९ अखेर ५३ लाख २० हजार हेक्टर आहे. तसेच निर्मित पाणीसाठा ४४०४० दशलक्ष घनमीटर इतका आहे. लागवडीलायक क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. राज्यात एकूण ३२४९ सिंचन प्रकल्प पूर्ण आहेत. यात ३१ मोठे १९२ मध्यम तर ३०२६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

त्याप्रमाणे बांधकामाधिन असे ३१३ प्रकल्प असून यात ६३ मोठे ७८ मध्यम व १७२ लघू प्रकल्प असल्याची माहिती प्रधान सचिवांनी दिली. तसेच जलसंपदा व लाभ क्षेत्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण केले.

या वेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, नाशिक येथील निरीचे महासंचालक नागेंद्र शिंदे आदींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली.

‘जल साक्षरता’ शालेय अभ्यासक्रमात घेऊ ः बच्चू कडू
जल साक्षरता हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शालेय अभ्यासक्रमात हा विषय घेण्याचा प्रयत्न करू. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्येही अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करता येईल का हे पाहिले जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. सिंचन प्रकल्प राबविताना कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही. त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला त्यांना मिळेल याकडे विभागाने दक्षतेने पाहावे, अशी सूचना राज्यमंत्र्यांनी केली.


इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...