agriculture news in Marathi Jejuri somavati yatra cancels Maharashtra | Agrowon

जेजुरीची सोमवती यात्रा रद्द 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 डिसेंबर 2020

कोरोनाचे संकट अद्यापही दूर न झाल्याने सरकारच्या नियमानुसार जेजुरी येथील खंडोबाची सोमवारी (ता. १४) होणारी सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे.

पुणे (प्रतिनिधी) ः कोरोनाचे संकट अद्यापही दूर न झाल्याने सरकारच्या नियमानुसार जेजुरी येथील खंडोबाची सोमवारी (ता. १४) होणारी सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार (ता. १२) ते सोमवारपर्यंत शहरात बाहेरील भाविकांच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
त्यामुळे भाविकांनी जेजुरीत यात्रेसाठी नियोजन करू नये, असे आवाहन देवस्थान आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे. 

यात्रेसंदर्भात ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पोलिस, आणि प्रशासनाची बैठक झाली. बैठकीत कोरोच्या संकटामुळे सोमवती यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र पारंपरिक पद्धतीने मोजक्याच ग्रामस्थ व मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्याचे नियोजन केले. 

कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे. पालखी सोहळा होणार नाही. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

पालखी सोहळाही रद्द 
प्रशासनाच्या आदेश व सूचनांचे पालन करण्यात येईल, रूढी व परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र पालखी सोहळा रद्द केला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे, असे आवाहन मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे यांनी केले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...