Agriculture news in Marathi Jigaon project victims will get proper compensation | Agrowon

जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य मोबदला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी आंदोलन सुरू केले होते. या मागण्यांबाबत गुरुवारी (ता. २२) रात्री जिल्हा प्रशासनाने डॉ. कुटे यांना लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी आंदोलन सुरू केले होते. या मागण्यांबाबत गुरुवारी (ता. २२) रात्री जिल्हा प्रशासनाने डॉ. कुटे यांना लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

बुधवारी (ता. २१) डॉ. कुटे हे समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनास बसले होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना शासन जुन्या आदेशाने मोबदला देणार की नवीन याचे लेखी आश्वासन द्यावे ही त्यांची प्रमुख मागणी होती.  जोपर्यंत लेखी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाची गोची झाली. सुमारे ४८ तास हे आंदोलन चालले. त्यानंतर जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पत्र व्यवहारानंतर तोडगा काढत जिल्हाधिकारी एम. राममूर्ती डॉ. कुटे यांना लेखी पत्र सोपविले.

जिगाव सिंचन प्रकल्पाअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील शेतकऱ्यांची एक लाख हेक्टरवर शेतजमिनी सोबतच ३२ गावे बुडीत क्षेत्रात येत असल्याने शासनाने प्रचलित नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, या संदर्भात गेल्या सरकारच्या काळात आदेश काढण्यात आले. एवढेच नव्हे तर काही गावांना नवीन निकषाप्रमाणे मोबदलाही देण्यात आला. या आधारावर जिल्हा प्रशासनाने संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकरी व भाजपाचे प्रशासनाकडे केली होती. मात्र, राज्यातील भाजपाचे सरकार गेल्यानंतर नव्या सरकारने वेळकाढू भूमिका घेत शेतकऱ्यांना मोबदला देण्यास गत नऊ महिन्यांपासून टाळाटाळ केली जात होती.


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...