जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू लागले

खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग कारखाने धडधडू लागले आहेत. यामुळे गावोगावी कापसाची खरेदी किंवा खेडा खरेदी सुरू आहे. सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. कापूस दरातील तेजी व कोविडसंबंधीच्या बाबी लक्षात घेता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे.
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू लागले Jinning pressing factories began to thrive in Khandesh
जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू लागले Jinning pressing factories began to thrive in Khandesh

जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग कारखाने धडधडू लागले आहेत. यामुळे गावोगावी कापसाची खरेदी किंवा खेडा खरेदी सुरू आहे. सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. कापूस दरातील तेजी व कोविडसंबंधीच्या बाबी लक्षात घेता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे. कोविडची समस्या खानदेशात अल्प आहे. जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात दोन ते पाच रुग्ण आढळत आहेत. धुळे कोविडमुक्त झाल्याची घोषणा मध्यंतरी झाली होती. पण अशातही कोविडच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन काम सुरू आहे. कारखान्यांमध्ये मध्य प्रदेशातील मजुरांची संख्या मोठी आहे. खानदेशातील दोन सूतगिरण्यादेखील सुरू झाल्या आहेत. यामुळे कापसाची मागणी, उठाव सुरू आहे. सुमारे १६० जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात आहेत. यातील ८० टक्के कारखाने जळगाव जिल्ह्यात आहेत.  जळगाव जिल्ह्यात सध्या ५० जिनिंग प्रेसिंग सुरू आहेत. एका कारखान्याला रोज किमान २०० क्विंटल कापसाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी संबंधित कारखान्यांना कापसाची खरेदी गावोगावी जाऊन करून घ्यावी लागत आहेत. कारण कापूस दर तेजीत आहेत. सध्या किमान ६८०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कापसाला मिळत आहे. कमी दर्जाच्या कापसाचीदेखील खरेदी दरात तडजोड करून घेतली जात आहे. कारण कापूसटंचाई दिसत आहे.  गुजरातमध्येही कापसाची खरेदी सुरू झाली आहे. तेथे कापूस लागवड व उत्पादन कमी येईल, अशी स्थिती असल्याने तेथील कारखानदार, व्यापारी खानदेश, पश्‍चिम विदर्भ, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार भागांतूनही कापसाची खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली. तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, सेंधवा, खेतिया आदी भागांतील बाजारातही कापसाचे दर अधिक आहेत. या भागातील कारखान्यांसाठीदेखील खानदेशातील कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती मिळाली. गेल्या वर्षी खानदेशात १० टक्केही कारखाने सुरू नव्हते. कारण कोविडमुळे खरेदीत अडथळे येत होते. शिवाय शासन किंवा कापूस महामंडळाने कापूस खरेदी केल्याने खासगी कारखानदार, व्यापाऱ्यांकडे कापसाची आवक अत्यल्प होती. यंदा मात्र कापूस महामंडळाचे खरेदी केंद्रच सुरू नाहीत. खासगी कारखानदार, व्यापारी कापसाची खेडा खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com