Agriculture News in Marathi Jinning pressing factories began to thrive in Khandesh | Page 3 ||| Agrowon

जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात धडधडू लागले

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग कारखाने धडधडू लागले आहेत. यामुळे गावोगावी कापसाची खरेदी किंवा खेडा खरेदी सुरू आहे. सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. कापूस दरातील तेजी व कोविडसंबंधीच्या बाबी लक्षात घेता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे.

जळगाव ः खानदेशात कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग कारखाने धडधडू लागले आहेत. यामुळे गावोगावी कापसाची खरेदी किंवा खेडा खरेदी सुरू आहे. सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. कापूस दरातील तेजी व कोविडसंबंधीच्या बाबी लक्षात घेता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे.

कोविडची समस्या खानदेशात अल्प आहे. जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात दोन ते पाच रुग्ण आढळत आहेत. धुळे कोविडमुक्त झाल्याची घोषणा मध्यंतरी झाली होती. पण अशातही कोविडच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन काम सुरू आहे. कारखान्यांमध्ये मध्य प्रदेशातील मजुरांची संख्या मोठी आहे. खानदेशातील दोन सूतगिरण्यादेखील सुरू झाल्या आहेत. यामुळे कापसाची मागणी, उठाव सुरू आहे. सुमारे १६० जिनिंग प्रेसिंग कारखाने खानदेशात आहेत. यातील ८० टक्के कारखाने जळगाव जिल्ह्यात आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सध्या ५० जिनिंग प्रेसिंग सुरू आहेत. एका कारखान्याला रोज किमान २०० क्विंटल कापसाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी संबंधित कारखान्यांना कापसाची खरेदी गावोगावी जाऊन करून घ्यावी लागत आहेत. कारण कापूस दर तेजीत आहेत. सध्या किमान ६८०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कापसाला मिळत आहे. कमी दर्जाच्या कापसाचीदेखील खरेदी दरात तडजोड करून घेतली जात आहे. कारण कापूसटंचाई दिसत आहे. 

गुजरातमध्येही कापसाची खरेदी सुरू झाली आहे. तेथे कापूस लागवड व उत्पादन कमी येईल, अशी स्थिती असल्याने तेथील कारखानदार, व्यापारी खानदेश, पश्‍चिम विदर्भ, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार भागांतूनही कापसाची खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली. तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, सेंधवा, खेतिया आदी भागांतील बाजारातही कापसाचे दर अधिक आहेत. या भागातील कारखान्यांसाठीदेखील खानदेशातील कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती मिळाली.

गेल्या वर्षी खानदेशात १० टक्केही कारखाने सुरू नव्हते. कारण कोविडमुळे खरेदीत अडथळे येत होते. शिवाय शासन किंवा कापूस महामंडळाने कापूस खरेदी केल्याने खासगी कारखानदार, व्यापाऱ्यांकडे कापसाची आवक अत्यल्प होती. यंदा मात्र कापूस महामंडळाचे खरेदी केंद्रच सुरू नाहीत. खासगी कारखानदार, व्यापारी कापसाची खेडा खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...