'जेएनपीटी' पथकाकडून ड्रायपोर्टसाठी 'निसाका'च्या जागेची पाहणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर केंद्राने मंजूर केलेल्या ड्रायपोर्टसाठी जागेची जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) चीफ इंजिनिअर एस. व्ही. मदाभावी, सहायक प्रबंधक आर. बी. जोशी, सहायक डायरेक्टर अँड वाय कनस्लटंट प्रशांत गुप्ता, समन्वयक सुजित गाडे यांनी बुधवारी (ता.२२) निफाड कारखान्यावर भेट देऊन पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी ‘निसाका’च्या अतिरिक्त ११० एकर जमिनीची पाहणी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. निफाडमध्ये होणाऱ्या या ड्रायपोर्टमुळे येथील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या जागेची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे पथक येथे आले होते.

निसाकापासून जवळच असलेल्या मुंबई-भुसावळ मार्गावरील रेल्वेचा विस्तृत प्लॅटफॉर्म व रोड कनेक्टिव्हिटी, पाण्याची सुविधा, नवीन रस्त्याची निर्मिती अशा सर्व बाजूंनी निसाकाच्या जागेची पाहणी केली. या तिन्ही बाबी ड्रायपोर्टला पूरक असल्याने जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी जमिनीस हिरवा कंदील दाखविला. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे आश्वासन या पथकाने दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com