मृत्युमुखी पडलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबातील एकास ‘एसटी’त नोकरी

मृत्युमुखी पडलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबातील एकास ‘एसटी’त नोकरी
मृत्युमुखी पडलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबातील एकास ‘एसटी’त नोकरी

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा मुंबई : मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागांत केलेल्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शनिवारी (ता. १) येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी काय करता येईल याबाबत गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे विधिमंडळात सांगितले होते. त्याअनुषंगाने आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबतच्या शासन निर्णयास अधिन राहून एसटी महामंडळ नोकरी देणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी या भेटीदरम्यान दिली होती. याशिवाय महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे लातूर विभागीय अध्यक्ष व्यंकटराव बिरादार यांनी मंत्री श्री. रावते यांना निवेदन देऊन मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या अनुषंगाने मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.   ''मराठा समाजबांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेत आंदोलने केली होती. पण काही दुर्दैवी घटनांमध्ये काही आंदोलकांना जीव गमवावा लागला. यामध्ये बहुतांशी तरुण आणि कमावत्या आंदोलकांचा समावेश होता. आता या आंदोलकांच्या कुटुंबीयांना पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी एसटी महामंडळ त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.'' - दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि अध्यक्ष, एसटी महामंडळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com