agriculture news in Marathi joint agresco from today Maharashtra | Agrowon

‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची (जाॅइंट अॅग्रेस्को ) मंगळवारपासून (ता.२७) बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची (जाॅइंट अॅग्रेस्को ) मंगळवारपासून (ता.२७) बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. 

यावेळी अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे राहतील. तर कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री बच्चू कडू, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा (राहूरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एस. ढवण (परभणी), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत (दापोली) यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम.भाले सहभागी होतील. 

उद्घाटन सत्राचे स्वागत विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे करतील. तर प्रास्ताविक कुलगुरू डॉ. भाले करतील. यानंतर राज्यमंत्री संजय धोत्रे, कृषिमंत्री दादा भुसे व शेवटी कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन कृषी व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरीहर कौसडीकर करतील. 

दरवर्षी मे महिन्यात होणारी ही बैठक यंदा रोटोशननुसार अकोल्यात नियोजित होती. मात्र या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. अखेरीस मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडून बैठकीबाबत हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मंगळवारपासून ही बैठक सुरु होत आहे. यात विविध वाण, यंत्र, तंत्र, शिफारशी ठेवल्या जाणार आहेत. 


इतर बातम्या
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...