agriculture news in Marathi joint aresco will be online Maharashtra | Agrowon

‘जॉईंट ॲग्रेस्को’ ऑनलाइन होणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक कोरोनामुळे यंदा लांबणीवर पडली होती.

अकोला ः खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक कोरोनामुळे यंदा लांबणीवर पडली होती. अखेरीस ही बैठक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने होऊ घातली असून त्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. 

कृषी विद्यापीठांचे संशोधन, शिफारशी, नवीन वाण प्रसारित करण्याच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची राहते. मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत दरवर्षी बैठक घेतली जाते. रोटेशननुसार ही बैठक यंदा अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार होती. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने बैठक घेण्यास अडचणी आल्या. साधारणपणे ही बैठक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असते. सन १९९३ पासून ही परंपरा आहे. 

या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रांनी विकसित केलेले वाण, शिफारशी, संशोधनाची मांडणी केली जाते. बैठकीदरम्यान तज्ज्ञांकडून त्यावर सविस्तर विचारमंथन होऊन शिक्कामोर्तब होत असते. प्रामुख्याने खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांचे वाण, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, यंत्र-तंत्र, शेतमाल उत्पादन वाढीसाठी शिफारशी, अशा विविध प्रकारच्या बाबी याद्वारे निश्‍चित होतात नंतर शेतकऱ्यांपर्यंत पोचतात. 

यंदाच्या बैठकीसाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मध्यंतरी बैठक घेऊन चर्चासुद्धा झाली होती. परंतु कोरोनाचा काळ न संपल्याने अखेरीस ही बैठक आता ऑनलाइन पद्धतीने होऊ घातली आहे. २७ ते ३१ ऑक्टोबर या काळात बैठक घेण्याचे नियोजन केले जात आहे. बैठकीच्या अनुषंगाने करावयाच्या विविध तयारी सुरु झाल्या आहेत. काही समित्यांचे गठणही होत आहे. लवकरच बैठकीच्या आराखड्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून बैठकीची निश्‍चितता अंतिम केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...