पुणे : मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रि
ताज्या घडामोडी
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना : कटारिया
या परिसरामध्ये ‘जलयुक्त शिवार’ची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र, पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी ही कामे पुरेशी नाहीत. त्यासाठी जल व मृद्संधारणअंतर्गत येणारी पारंपरिक कामे म्हणजे सलग समतल चर, दगडी बंधारे (लूज बोल्डर), माती बांध, बोअरवेल, विहीर पुनर्रभरण अशा प्रकारची कामे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.
- राकेश कटारिया, सहसचिव, पंतप्रधान कार्यालय.
वाल्हे, जि. पुणे : राज्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली. मात्र, केवळ जलसंधारणाची कामे करून निसर्गाचा समतोल राखणे शक्य नाही. त्यासाठी मृद्संधारण आणि पाण्याचे व्यवस्थापन होणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच केंद्र सरकार जलशक्ती योजना कार्यान्वित करीत आहे. त्याद्वारे जल आणि मृद्संधारणाची पारंपरिक कामे नव्याने सुरू करणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव राकेश कटारिया यांनी केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे कटारिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट देऊन येथे झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी करीत जलशक्ती योजनेंतर्गत काय कामे करता येतील, याची चाचपणी व मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमलकर, तहसीलदार अतुल म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, संजय फडतरे, अमोल खवले, राजाराम भामे, नीलेश पाटील, हनुमंत डांबे, प्रदीप भंडलकर, जॉन गायकवाड, गीता पवार उपस्थित होते.
पथकाने पुरंदर तालुक्यातील दिवे व नाझरे धरण परिसरात पूर्वनियोजित पाहणी दौरा होता. मात्र, पथकाने अचानक वाल्हे परिसरातही भेट देऊन परिसराची पाहणी केली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत प्रस्तावित कामासंदर्भातही कटारिया यांनी सूचना केल्या.
पुरंदरमधील ६० गावांमध्ये योजना
जलशक्ती योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून पुरंदर आणि शिरूर या तालुक्यांची निवड केंद्र सरकारमार्फत करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील जवळपास ६० गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. जलसंपदा, पाटबंधारे, कृषी, वन विभाग या सरकारी यंत्रणांच्या समन्वयातून हे काम पार पाडले जाणार आहे.
- 1 of 1101
- ››