agriculture news in marathi, Joint Secretary visits in purandar, pune, maharashtra | Agrowon

जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना : कटारिया
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

या परिसरामध्ये ‘जलयुक्त शिवार’ची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. मात्र, पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी ही कामे पुरेशी नाहीत. त्यासाठी जल व मृद्‌संधारणअंतर्गत येणारी पारंपरिक कामे म्हणजे सलग समतल चर, दगडी बंधारे (लूज बोल्डर), माती बांध, बोअरवेल, विहीर पुनर्रभरण अशा प्रकारची कामे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. 
- राकेश कटारिया, सहसचिव, पंतप्रधान कार्यालय. 

वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली. मात्र, केवळ जलसंधारणाची कामे करून निसर्गाचा समतोल राखणे शक्‍य नाही. त्यासाठी मृद्‌संधारण आणि पाण्याचे व्यवस्थापन होणे अत्यावश्‍यक आहे. म्हणूनच केंद्र सरकार जलशक्ती योजना कार्यान्वित करीत आहे. त्याद्वारे जल आणि मृद्‌संधारणाची पारंपरिक कामे नव्याने सुरू करणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव राकेश कटारिया यांनी केले. 

वाल्हे (ता. पुरंदर) येथे कटारिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट देऊन येथे झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी करीत जलशक्ती योजनेंतर्गत काय कामे करता येतील, याची चाचपणी व मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमलकर, तहसीलदार अतुल म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, संजय फडतरे, अमोल खवले, राजाराम भामे, नीलेश पाटील, हनुमंत डांबे, प्रदीप भंडलकर, जॉन गायकवाड, गीता पवार उपस्थित होते.

पथकाने पुरंदर तालुक्‍यातील दिवे व नाझरे धरण परिसरात पूर्वनियोजित पाहणी दौरा होता. मात्र, पथकाने अचानक वाल्हे परिसरातही भेट देऊन परिसराची पाहणी केली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत प्रस्तावित कामासंदर्भातही कटारिया यांनी सूचना केल्या. 

पुरंदरमधील ६० गावांमध्ये योजना 
जलशक्ती योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून पुरंदर आणि शिरूर या तालुक्‍यांची निवड केंद्र सरकारमार्फत करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्‍यातील जवळपास ६० गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. जलसंपदा, पाटबंधारे, कृषी, वन विभाग या सरकारी यंत्रणांच्या समन्वयातून हे काम पार पाडले जाणार आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...