पोषण आहारात आता भाकरी; शिक्षण विभागाचा निर्णय

पोषण आहारात आता भाकरी; शिक्षण विभागाचा निर्णय
पोषण आहारात आता भाकरी; शिक्षण विभागाचा निर्णय

सोलापूर ः राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबरपासून पोषण आहारामध्ये ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आता भाकरीची चवही चाखता येणार आहे. अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सध्या तांदूळ दिला जात होता. मात्र, त्यामध्ये २५ टक्के कपात करून ऑक्‍टोबरपासून ज्वारी, बाजरी व नाचणीचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पटसंख्येनुसार त्याची मागणी करण्यासही सांगितले आहे. या तीन धान्यांचा समावेश केल्याने नवा ‘मेनू'' कोणता करायचा हे ठरविण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीन धान्यांचा समावेश केल्यानंतर पाककृतींची जिल्हा स्तरावर निश्‍चिती करायची आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा केला जात होता. मात्र, आता तांदळामध्ये २५ टक्के कपातीचा निर्णयही घेतला आहे. पाककृती ठरविताना गोंधळ या तीन धान्यांचा समावेश झाल्यानंतर जिल्हा स्तरावर पाककृती ठरविताना गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. ज्वारी व बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय झाला तर त्या भाकरी करणार कोण? भाकरी तयार करण्यासाठी लागणारे पीठ दळून कोण आणणार यांसारखे अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होते ते पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com