दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात रब्बीत ज्वारी बियाणे बदलाचे प्रमाण अवघे नऊ टक्के
नगर ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा सुधारित जातींचा वापर करण्याचे आवाहन केले जात असले तरी, ज्वारीत बियाणे बदलाचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक गावरान जातीचे बियाणे पेरणीसाठी वापरतात. गव्हाच्या बियाण्यात ५७ टक्के बदलाचे प्रमाण आहे. करडई बियाण्यात बहुतांश प्रमाणात बदल केला जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
नगर ः पेरणी करताना पारंपरिक बियाण्यांपेक्षा सुधारित जातींचा वापर करण्याचे आवाहन केले जात असले तरी, ज्वारीत बियाणे बदलाचे प्रमाण अवघे नऊ टक्के आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक गावरान जातीचे बियाणे पेरणीसाठी वापरतात. गव्हाच्या बियाण्यात ५७ टक्के बदलाचे प्रमाण आहे. करडई बियाण्यात बहुतांश प्रमाणात बदल केला जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पीक उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी तज्ज्ञ, कृषी विभाग, शासन वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक जातींपेक्षा पेरणीसाठी सुधारित जातींचा वापर करून उत्पादनात वाढ करावी, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. रब्बीत मात्र खरिपापेक्षा बियाणे बदलाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून येत आहे.
नगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात सरासरी ६ लाख ६५ हजार ८४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. त्यात सर्वाधिक ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर ज्वारीचे क्षेत्र आहे. एक लाख १८ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र असून, जवळपास पन्नास हजार हेक्टर गव्हाचे क्षेत्र आहे. बहुतांश भागात ज्वारीच्या गावरान जातींची पेरणी केली जाते. पेरणीसाठी नव्याने विकसित झालेल्या जातींपेक्षा जुन्या जातींवर शेतकऱ्यांचा अधिक भरवसा आहे.
गव्हामध्ये बियाणे बदल बऱ्यापैकी झालेला असला तरी, अजूनही प्रमाण वाढत नाही. हरभऱ्याचे चांगले उत्पादन देणाऱ्या जाती उपलब्ध आहेत. हरभऱ्याच्या नव्या जाती असूनही १८ टक्क्यांच्या पुढे बियाणे बदल होताना दिसत नाही. करडईचे क्षेत्र कमी असले तरी बियाणे बदलाचे प्रमाण मात्र सर्वाधिक आहे.
‘मालदांडी’ला सर्वाधिक मागणी
जिल्ह्यातील जामखेड, शेवगाव,पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, नगर तालुक्यातील बहुतांश भागात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. या भागाला ज्वारीचे आगार म्हणून ओळखले जाते. नगर जिल्ह्यालगत असलेल्या बीड, सोलापूर भागांतही ज्वारीचे क्षेत्र मोठे असते. खाण्यासाठी चवदार अशी ओळख असलेल्या मालदांडी ज्वारीला सर्वाधिक मागणी असते. बाजारातही दर चांगला मिळत असल्याने हीच ज्वारी जास्तीत जास्त पेरली जाते. विशेष म्हणजे अनेक सुधारित जाती विकसित झाल्या असल्या तरी ‘मालदांडी’शी स्पर्धा करणारी जात विकसित झालेली नाही, असे जाणकार शेतकरी सांगतात.
ज्वारी | ९ |
गहू | ५७ |
हरभरा | १८ |
सूर्यफूल | ० |
करडई | ९३ |
मका | १९ |