Agriculture news in Marathi, Jowari can be harvested before Diwali | Agrowon

खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी शक्‍य
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका आदी खरेदीची तयारी सुरू झालेली असतानाच खानदेशात ज्वारी पिकाची स्थिती बऱ्यापैकी आहे. दिवाळीपूर्वी ज्वारीची कापणी पूर्ण होऊ शकते. मध्यंतरी ज्वारीवर दिसलेली लष्करी अळी नंतर पिकावरून दूर झाल्याने पीकस्थिती बऱ्यापैकी आहे. 

जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका आदी खरेदीची तयारी सुरू झालेली असतानाच खानदेशात ज्वारी पिकाची स्थिती बऱ्यापैकी आहे. दिवाळीपूर्वी ज्वारीची कापणी पूर्ण होऊ शकते. मध्यंतरी ज्वारीवर दिसलेली लष्करी अळी नंतर पिकावरून दूर झाल्याने पीकस्थिती बऱ्यापैकी आहे. 

खानदेशात चारा, धान्यासाठी पशुधनपालक, मोठे शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. जळगावमधील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, शहादा, तळोदा भागांत केळी, गहू आदी पिकांसाठी बेवड म्हणूनही ज्वारीची पेरणी केली जाते. यंदा पेरणी वेळेत म्हणजेच २० जूनपूर्वी झाली होती. पिकाची वाढ उत्तम झाली. परंतु पेरणीनंतर महिनाभरात पिकावर लष्करी अळी दिसून आली होती. नंतर अगदी निसवणीपर्यंत ही अळी ज्वारी पिकावर दिसत होती. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, जामनेर या भागांतून ज्वारीवर लष्करी अळी आल्याच्या व त्यामुळे पिकाचे १० ते १५ टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी उपाययोजनाही सुरू केल्या. त्यात पिकाच्या पोग्यात वाळू किंवा निर्देशीत कीडनाशके टाकली होती. ऑगस्टच्या मध्यानंतर झालेल्या जोरदार पावसात पिकाची वाढ झाली. नंतर निसवणही जोमात झाली. सप्टेंबरमध्ये पिकावरील लष्करी अळीच्या तक्रारीदेखील कमी झाल्या. 

सद्यःस्थितीत पिकात कणसे पक्व होत आहेत. वाढ पाच ते सात फुटांपर्यंत असल्याने चाराही चांगला मिळेल. तसेच उत्पादनही चांगले साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. खानदेशात मिळून सुमारे ४० हजार हेक्‍टरवर ज्वारी आहे. या पिकावर नंतर अनेक शेतकरी केळी, गहू, हरभरा पेरणीचे नियोजन करीत आहेत. पिकाची कापणी दिवाळीपूर्वी सुरू होईल. तर मळणी नोव्हेंबरच्या सुरवातीला होऊन पीक हाती येईल. 

शासकीय केंद्रात दर्जेदार ज्वारीची २५५० व २५७० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाणार आहे. यामुळे यंदा ज्वारीचे दरही टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे. उत्पादन १०० टक्के साध्य होणार असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी...मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी...
शेतकऱ्यांवर रब्बी ज्वारीचे पीक...औरंगाबाद : मकानंतर आता रब्बी ज्वारीवर लष्करी...
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
खानदेशात रब्बीसाठी प्रकल्पांमध्ये...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामाची शेतकरी...
पुणे : हरभरा उत्पादनवाढीसाठी ४००...पुणे ः हरभरा उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात अकरा...
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल...नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण...
खारपाण पट्ट्यातील कापूस हंगामही अडचणीतअकोला ः सततच्या पावसाने खरिपातील सर्वच...
पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार...पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे...
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के...कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने...
जालना जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मिळेना...जालना : जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, मक्याची...
हिंगोली : पावणेदोन कोटीचे कृषी...हिंगोली : जिल्ह्याचा २०२०-२१ या वर्षीचा संभाव्य...
सांगलीत ९९ हजार हेक्टरवर पिकांचे पंचनामेसांगली : ऑक्टोबरमधील पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे...सोलापूर : ऑक्‍टोबर महिन्यात मॉन्सुनोत्तर पावसाने...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...