मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी कीडनाशकांचा योग्य वापर हवा : मुंडले
नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही दिवसेंदिवस कमी चालली आहे. या मागील कारणांपैकी कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर हे मुख्य कारण आहे. त्यामुळे मधमाश्या व मित्रकीटक यांची हानी होणार नाही या पद्धतीने कीडनाशकांचा वापर समंजसपणे व योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘अॅग्रोवन’चे उप-मुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी केले.
नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही दिवसेंदिवस कमी चालली आहे. या मागील कारणांपैकी कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर हे मुख्य कारण आहे. त्यामुळे मधमाश्या व मित्रकीटक यांची हानी होणार नाही या पद्धतीने कीडनाशकांचा वापर समंजसपणे व योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘अॅग्रोवन’चे उप-मुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी केले.
पूर्वा केमटेक प्रा.लि व ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि यांच्या विद्यमाने आयोजित ‘मधुक्रांती २०१९’ या दुसऱ्या दिवसाच्या परिसंवादात ते बोलत होते. डॉ. गोपाळ पालीवाल, डॉ. गोराडे, महादेव जाधव, सुरेश पुंड, गौतम डेमसे, नानासाहेब इंगळे या सर्व मधमाशी पालन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी डॉ. जे.के. पूरकर, डॉ. सूर्या गुंजाळ, डॉ. बी.बी. पवार, डॉ. तुकाराम निकम, पूर्वा केमटेक प्रा.लि.चे कार्यकारी संचालक संजय पवार, परिसंवादाचे समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड आदींसह अनेक तज्ज्ञ, शेतकरी, युवकांचा सहभाग होता.
श्री. मुंडले म्हणाले,‘‘कीडनाशकांचा वापर लेबल क्लेमनुसार करावा, मधमाश्या सक्रिय असताना वापर करू नये. तसेच फवारणीची वेळ संध्याकाळी ठेवावी. मधमाश्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे शास्त्रीय पुरावे आढळल्याने युरोपीय महासंघाने निओनिकोटिनॉइड्स या रासायनिक गटातील तीन कीटकनाशकांवर बंदी घातली आहे, हे जगासमोरील आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.’’
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल (जि. पालघर) पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी पेटीत पाळता येणाऱ्या सातेरी माश्या आणि मेलिफेरा मधमाश्यांना होणारे रोग (नोसेमा, फाउल ब्रूड इ), किडी (मेणकीडा, मुंगळे, पाली, सारडा, पक्षी, काही कीटक) त्यांची ओळखण्याची लक्षणे तसेच योग्य व्यवस्थापन, नैसर्गिक मधमाशी वसाहत पेटीत भरण्याची कला, मधमाशी पालन करताना त्यातील बारकावे, पेटीची वेळेत साफसफाई करण्याची गरज व योग्य संगोपन कसे करावे? याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
परिसंवादाचे समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड यांनी भविष्यात मधमाशी पालक, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांचे राज्यस्तरीय संघटन तयार करणार असून, यातून या व्यवसायाला महाराष्ट्रामध्ये चालना देण्यासाठी ‘पूर्वा केमटेक’च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ‘शाश्वत शेती आणि उद्योजकतेसाठी मधमाशी पालन’ या परिसंवादाला दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला.
उपस्थितांचे शंका समाधान व प्रश्नांना उत्तरे ही दिली.मधमाश्यांविषयी समाज जागृती करण्याच्या दिशेने मोलाचे पाऊल टाकल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवर आणि सहभागींनी डॉ. बी.बी. पवार यांचा सत्कार केला. भविष्यात मधमाशी व्यवसायाला चालना मिळण्यासाठी पुढील वर्षीही अशाच प्रकारे आयोजन करण्याचा मनोदय ‘पूर्वा केमटेक’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी व्यक्त केला.
- 1 of 1022
- ››