Agriculture news in Marathi July 10 agitation against seed companies | Agrowon

रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

वाशीम जिल्ह्यात तर मालेगाव, रिसोड तालुक्यात हे क्षेत्र अधिक विस्तारत आहे. शेतकऱ्यांना विक्रीची व्यवस्था म्हणून रिसोड बाजार समितीने हळदीची खरेदी-विक्री सुरू केली आहे. 

अकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे ओढा वाढत आहे. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात तर मालेगाव, रिसोड तालुक्यात हे क्षेत्र अधिक विस्तारत आहे. शेतकऱ्यांना विक्रीची व्यवस्था म्हणून रिसोड बाजार समितीने हळदीची खरेदी-विक्री सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता बाजार समितीने आठवड्यातील दोन दिवस हळदीचे व्यवहार सुरू केले आहेत, अशी माहिती सचिव विजय देशमुख यांनी दिली आहे.

रिसोड बाजार समितीने सभापती सुमन माधवराव भुतेकर, उपसभापती प्रभाकर साबळे तसेच संचालक मंडळाच्या पुढाकारात यावर्षी ४ जूनपासून खरेदीला सुरुवात केली. पाच आठवड्यात सुमारे १८ हजार क्विंटलचे व्यवहार झाले आहेत. हळदीची आवक वाढत चालल्याने आता गुरुवारसोबतच सोमवारीसुद्धा या बाजार समितीने हळदीचे व्यवहार सुरू केले आहेत. या दोन दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत शेतकऱ्यांना हळद बाजारात आणावी लागेल.

हळद विक्रीसाठी कुठलीही नोंदणी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावून वेळोवेळी हात निर्जंतुक करावेत, अशा सूचना दररोज केल्या जात आहेत. गेल्या गुरुवारी या बाजार समितीत हळदीची आठ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती.

हळदीची वाढती आवक पाहता शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने हळद खरेदीसाठी बाजार समितीने आता दोन दिवस सुरू करण्याची सूचना माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी दिली होती. संचालक मंडळाने याबाबत अडते खरेदीदार यांच्यासोबत चर्चा केली आणि आता हळद खरेदी दोन दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या सुविधेचा फायदा होईल.
- सुमन माधवराव भुतेकर,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड, जि. वाशीम


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...