जुलैतील नुकसानीपोटी अकोल्याला ५४ कोटी

अकोलाः जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय घरांचीही पडझड झाली. शासनाने पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा म्हणून ५४ कोटींचा निधी दिला आहे. यात शेतीच्या नुकसानीसाठी काही निधी दिला आहे.
July losses 54 crore to Akola
July losses 54 crore to Akola

अकोलाः जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय घरांचीही पडझड झाली. शासनाने पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा म्हणून ५४ कोटींचा निधी दिला आहे. यात शेतीच्या नुकसानीसाठी काही निधी दिला आहे. 

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच ऑगस्ट व या महिन्यातही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात खरिपात सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानग्रस्तांना मदत मिळालेली नसल्याने रोष वाढत होता. शासनाने याची दखल घेत जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे.

जिल्ह्यात २१ जुलैच्या रात्री ७ वाजेपासून संततधार पाऊस झाला होता. त्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ३९९ गावे बाधित होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. 

अकोट, बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय निकषानुसार ८ कोटी ५६ लाख ६ हजार, तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १० कोटी ४३ लाख ५६ हजार रुपये, अशी एकूण १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली.

मदत लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यांवर

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १० हजार २३६ घरांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ९ हजार ९६५ घरांचे अंशतः: तर २७१ घरांचे पूर्णतः: नुकसान झाले आहे. अकोला तालुक्यातील ८४०० घरांचे अंशतः: तर २२० घरांचे पूर्णतः: नुकसान झाले होते. घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झालेल्यांसाठी शासनाने २ कोटी ५६ लाख ५ हजार, तर अंशतः पडझड झालेली कच्ची पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्‍यांसाठी १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. हा निधी लवकरच नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com