agriculture news in marathi, Junkyut's work of 42 bondage stops | Agrowon

‘जलयुक्त‘ची ४२ बंधाऱ्यांची कामे रखडली

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

परभणी : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या आराखड्यातील सिमेंट बंधाऱ्यांच्या एकूण १०३ कामांपैकी ४२ बंधाऱ्याची कामे अपूर्ण आहेत. नालाबांध खोलीकरणाची २५ कामे आणि सिमेंट बंधारे दुरुस्तीची ६७ कामे रखडली आहेत. कामे झाल्यास येत्या पावसाळ्यात त्यामध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

परभणी : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या आराखड्यातील सिमेंट बंधाऱ्यांच्या एकूण १०३ कामांपैकी ४२ बंधाऱ्याची कामे अपूर्ण आहेत. नालाबांध खोलीकरणाची २५ कामे आणि सिमेंट बंधारे दुरुस्तीची ६७ कामे रखडली आहेत. कामे झाल्यास येत्या पावसाळ्यात त्यामध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीअंतर्गत लघू सिंचन विभागातर्फे जिंतूर तालुक्यात ३२, सेलू तालुक्यात १२, मानवत तालुक्यात २, पाथरीत ९, पूर्णा तालुक्यात १२ असे एकूण ६७ सिमेंट बंधाके मंजूर आहेत. त्यांच्या कामांसाठी ३ कोटी ६४ लाख ७६ लाख रुपये निधी मंजुर झाला. परंतु, त्यापैकी ६६ बंधा-यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.

गेल्या दोन वर्षात यापैकी २९ सिमेंट बंधा-यांची कामे पूर्ण झाली. अद्याप ३७ बंधा-यांची कामे अर्धवट आहेत.
नालाखोलीकरणाच्या कामांचे परभणी, पूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येकी ६, जिंतूर तालुक्यात १९, सेलू तालुक्यात १२, मानवत तालुक्यात ५, पाथरी तालुक्यात ७, गंगाखेडमध्ये ४ असे एकूण ५९ कार्यारंभ देण्यात आले. त्याची किंमंत १ कोटी १४ लाख रुपये आहे. यापैकी ५१ कामे पूर्ण झाली. ६ कामे अपूर्ण असून २ कामे सुरू झाली नाहीत. सिमेंट नाला बांध दुरुस्तीच्या कामांच्या १३३ कामांपैकी ८५ कामे पूर्ण झाली आहेत. अद्याप ४३ कामे अपूर्ण आहेत.
२०१८-१९ मध्ये सिमेंट बंधा-यांची एकूण २ कोटी १४ लाख ८६ लाख रुपये किंमती जिंतूर तालुक्यात २० कामे, सेलू तालुक्यात ५, पूर्णा तालुक्यात ११ असे एकूण ३६ कामांपैकी २५ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी केवळ ११ बंधा-यांची कामे पूर्ण झाली. सिमेंटनाला बांध खोलीकरणाची १ कोटी १९ लाख रुपयांची जिंतूर तालुक्यात २८, सेलू तालुक्यात ७, गंगाखेड तालुक्यात २८, पूर्णा तालुक्यात १७ कामे मिळून ५५ कामांना मान्याता मिळाली. त्यापैकी ११ कामे पूर्ण झाली. १९ कामे अर्धवट आहेत. ९ कामे सुरू झाली नसल्याची स्थिती आहे. 

कामाच्या दर्जाबाबत तक्रारी

नाला बांध दुरुस्तीची ९५ पैकी २२ कामे पूर्ण, २४ अपूर्ण, तर १८ कामे अद्याप सुरू झाली नाहीत. सिमेंट नाला बंधा-याच्या कामासाठी निकृष्ट बांधकाम साहित्य वापरले जाते असल्याचे प्रकार घडत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. 


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...