जलक्रांतीचा ‘जुनोनी पॅटर्न' राज्यभर राबविला जाईल : देशमुख

जलक्रांतीचा ‘जुनोनी पॅटर्न' राज्यभर राबविला जाईल : देशमुख
जलक्रांतीचा ‘जुनोनी पॅटर्न' राज्यभर राबविला जाईल : देशमुख

सांगोला  : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जुनोनी तलावाची उंची वाढविण्यासंदर्भात तांत्रिक बाबींची तपासणी करावी लागेल. धोका नसल्यास उंची वाढविण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जातील. सांगोला तालुक्‍यातील जुनोनी परिसरात शेतकऱ्यांकडून वॉटरमीटरद्वारे पाणी उचलण्याचा उपक्रम बिरूदेव पाणी वापर संस्थेच्या पुढाकाराने राज्यभर राबविला जाईल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

देशमुख यांनी रविवारी (ता. १५) येथील यमाई तलावास भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात प्रस्ताव तयार करण्याबाबतच्या सूचना देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यमाई तलावाची पाणी साठवण क्षमता २९.५० दशलक्ष धनफूट इतकी आहे, तर प्रकल्पीय क्षमता ११६ हेक्‍टर आहे. शेतकऱ्यांना नियमित उपसा सिंचन परवाने दिल्यास शासनाच्या प्रचलित दराने त्यांच्याकडून पाणीपाट्टीची आकारणी होईल, ही बाब देशमुख त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याबाबतही विचार करू, असे आश्‍वासन देशमुख यांनी दिले. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com