जळगावात पीक कर्जवाटपाबाबत नुसत्याच घोषणा

जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत. परंतु, पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे. अनेक बॅंका तर पीक कर्जासंबंधी काम करायला तयार नाहीत. महिनाभर थांबा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत.
Just announcement about crop loan disbursement in Jalgaon
Just announcement about crop loan disbursement in Jalgaon

जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत. परंतु, पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे. अनेक बॅंका तर पीक कर्जासंबंधी काम करायला तयार नाहीत. महिनाभर थांबा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात एका आघाडीच्या राष्ट्रीयीकृत बॅंकेची जळगाव शहरातील मुख्य कृषी शाखा कोरोना व इतर कारणांमुळे तब्बल आठवडाभरापासून बंद आहे. 

पीक कर्ज वितरणाचा अघोषित बंद राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पुकारला आहे. जिल्ह्यात फक्त जिल्हा बॅंकेचे कामकाज सुरळीत सुरू आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात आहे. परंतु, ग्रामीण, राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र शेती, पीक कर्जाचे नवे प्रस्ताव स्विकारणे, या कर्जासाठी बॅंक खाते उघडणे, जुन्या माहितीमध्ये दुरुस्ती करून पीक कर्ज वाढवून देणे, याची कुठलीही कामे करायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शाखांमधून परत पाठविले जात आहे. अग्रणी बॅंकेचे कुठलेही अधिकारी जबाबदारीने काम करत नाहीत. जिल्ह्यात पीक कर्जाचा मोठा गोंधळ सुरू असून, शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ५० कोटीदेखील पीक कर्जाचे वितरण केलेले नाही. या बॅंकांना सुमारे १४०० कोटी रुपयांचा कृषी पतपुरवठा आराखडा लागू केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने आढावा बैठक घेवून पीक कर्जाचे प्रस्ताव मार्गी लावावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  एका शेतकऱ्याला वाईट अनुभव 

एका शेतकऱ्याने पीक कर्ज मिळविण्यासाठी किती दमछाक होत आहे? व बॅंका कशी मनमानी करीत आहेत? याचा अनुभव ‘ॲग्रोवन’कडे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितला. त्यानुसार, मार्चमध्ये पीक कर्जासाठी एका ग्रामीण भागातील बॅंकेशी बोलणी केली. तेव्हा कोरोनामुळे महिनाभर थांबा, आम्ही बॅंकेत प्रवेश देत नाहीत, असे संबंधितांनी सांगितले होते. आता दोन महिने झाले तरी हीच कारणे संबंधित बॅंकेतील मंडळी देत आहेत. जळगाव शहरातील एका ग्रामीण बॅंकेशी चर्चा केली. तेथे तर आम्ही तुमच्या गावासाठी पीक कर्ज देण्याचे काम करीत नाही. दुसरीकडे जा..., असे सांगितले.  मंत्र्यांच्या नुसत्यात घोषणा, चमकोगिरी 

जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत. दुसरीकडे केंद्र सरकारचे मंत्री रोज शेतीच्या वित्तपुरवठ्याच्या नव्या घोषणा करतात. लाख कोटींचे पॅकेज दाखविले जाते. वेगवेगळे आकडे सांगतात. राज्य सरकारची मंडळी नवनवी माहिती देवून प्रसार माध्यमांमध्ये चमकत आहेत. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी हेलपाटे सुरू आहेत. बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी जुमानत नाहीत. हा घोषणांचा कारखाना जोरात सुरू आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला, तर शेतकरी खरीप हंगाम कसा पेरतील? शेती नापेर राहील, असा संताप या शेतकऱ्याने व्यक्त केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com