Agriculture news in marathi Just a gentle breeze in Solapur | Agrowon

सोलापुरात नुसताच सोसाट्याचा वारा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

सोलापूर  ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह अनेक भागात मोठा फटका बसला. दरम्यान, जिल्ह्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हलकी हजेरी लागली.

सोलापूर  ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह अनेक भागात मोठा फटका बसला. दरम्यान, जिल्ह्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हलकी हजेरी लागली. याशिवाय या वादळवाऱ्याचा तेवढा परिणाम जाणवला नाही. दिवसभर नुसता सोसाट्याच्या वारा सुटतो आहे. पंढरपूर, माढा, करमाळ्यात काही प्रमाणात त्याचा फटका बसला. 

या चक्रीवादळाच्या झळा जिल्ह्याला तेवढ्या प्रमाणात बसल्या नाहीत. पण, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. दिवसभर सातत्याने सोसाट्याचा वारा सुटत आहे. दुपारी एकीकडे तीव्र ऊनाने प्रचंड उकाडा आणि मध्येच वादळवाऱ्यामुळे वातावरणाचा नूर बदलत आहे. वाऱ्याचा काहीही परिणाम अद्याप तरी झालेला नाही. 

दरम्यान, सोमवारपासून बुधवारी (ता.३) रात्रीपर्यंत सलग तीन दिवसांत पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळ्याच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाने हलकी हजेरी लावली. दिवसभराच्या वादळवाऱ्याच्या वातावरणानंतर रात्रीच्या या पावसाने काहीठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले आहे. 

पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील दशरथ बनकर यांच्या काढणीस आलेल्या अडीच एकरच्या खरबूजाचा प्लॅाट पूर्णपणे खराब झाला. कूसूर (ता.दक्षिण सोलापूर) भागात परवा काही घरावरील पत्रे उडाले. बार्शी तालुक्यातील गौडगाव, वैराग भाग, उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी भागात वीजेचा लपंडाव सुरु राहिला. सध्या या भागात पाणी टंचाई आहे. त्यात वीज गेल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. 

नियंत्रण कक्ष नावालाच 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाऊस आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापला आहे. पण, सध्या जिल्हा प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना नियंत्रणावर आहे. गेल्या काही दिवसापासून बरेचसे अधिकारी, कर्मचारी याच कामावर असल्याने या कक्षाचे कामकाज अद्याप पुरेशा कार्यक्षमतेने सुरु नाही. 
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...