Agriculture news in marathi Just in time for the crumbs on the grain Manage: Bhosle | Agrowon

धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करा ः भोसले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात धानावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या सूचनानुसार धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करावे.’’

नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात धानावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या सूचनानुसार धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करावे’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर.जे. भोसले यांनी केले.

भोसले म्हणाले, ‘‘प्रादुर्भावग्रस्त पिकांवर तुडतुडे समुहाने राहून खोडातील रस शोषण करतात. त्यामुळे झाडे पिवळे व कमकुवत होतात. झाडांची वाढ खुटते. झाडाच्या लोंब्यावर विपरीत परिणाम होऊन दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. तुडतुड्यामुळे विषाणुंची लागण होऊन पीक गवतासारखे, खुरटल्यासारखे व लोंब्या करपल्यासारखे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुध्यांजवळ निरीक्षण केल्यास असंख्य प्रमाणात तुडतुडे दिसून येतात. बरेचदा झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पोषक वातावरणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढून संपूर्ण बांधीमध्ये पसरतो. उत्पादनात लक्षणीय घट येते.’’

‘‘तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वाजवीपेक्षा नत्र खताचा वापर करु नये, प्रकाश सापळ्यांचा वापर करा. प्रादुर्भाव झाल्यास बांधातील पाणी ३ ते ४ दिवसांसाठी बाहेर सोडा. मेटॅरायझियम अनिसोप्ली १.१५ टक्के भुकटीचा २.५ किलो प्रति हेक्टर बांधामध्ये वापर करावा, असेही भोसले म्हणाले.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...