Agriculture news in marathi, The jwar arrives in Khandesh markets | Agrowon

खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक शून्य

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात अजूनही ज्वारीची आवक सुरू झालेली नसल्याची स्थिती आहे. 

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर, यावल, चाळीसगाव, धरणगाव-एरंडोल, धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार या बाजार समित्या ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. धुळ्यातील दोंडाईचा बाजारात ज्वारीची मोठी आवक दरवर्षी होते. मागील हंगामात ऑक्‍टोबरमध्येच आवक सुरू झाली होती.

जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, बाजारात अजूनही ज्वारीची आवक सुरू झालेली नसल्याची स्थिती आहे. 

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर, यावल, चाळीसगाव, धरणगाव-एरंडोल, धुळ्यातील दोंडाईचा (ता.शिंदखेडा), शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार या बाजार समित्या ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. धुळ्यातील दोंडाईचा बाजारात ज्वारीची मोठी आवक दरवर्षी होते. मागील हंगामात ऑक्‍टोबरमध्येच आवक सुरू झाली होती.

अमळनेरच्या बाजारात ऑक्‍टोबरमध्ये प्रतिदिन तीन ते चार हजार क्विंटलची आवक सुरू होती. तर जळगावच्या बाजारातही प्रतिदिन तीन हजार क्विंटलपर्यंतची आवक होत होती. नोव्हेंबरअखेरपर्यंत ज्वारीची बाजार समित्यांमध्ये चांगली आवक सुरू होती. दर १५०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत होते. यंदा मात्र ज्वारीची कुठलीही आवक सुरू नाही. 

यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर आदी भागात अतिपावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. कडबा काळवंडला. दाण्यांना कोंब फुटले. ज्वारीचा दर्जा एवढा घसरला आहे, की तिची मळणी करणेही अशक्‍य झाले आहे.

कणसे तशीच शेतात सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून अतिपावसामुळे सर्वत्र आली. जेथे ज्वारीचे पीक उभे आहे, त्या पिकात कणसांमधील दाणे आपसूकच जमिनीवर गळून पडत आहेत. त्यांची मळणी करणेही शक्‍य नाही. अशी स्थिती असल्याने बाजारात अपवाद वगळता ज्वारीची आवक सुरू झालेली नाही. पुढेही आवक होणार नाही. जळगावच्या बाजारात फक्त जालना, लातूर भागातून ज्वारीची आवक पुढे होऊ शकते, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ज्वारीचा तुटवडा असल्याने काळवंडलेल्या किंवा निकृष्ट ज्वारीसही प्रतिक्विंटल १७०० रुपयांचा दर आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...