ज्वारीचा पेरा निम्म्याने घटला

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. पेरणीस पोषक वातावरण नसल्याने आतापर्यंत निम्म्याच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत केवळ ७ लाख ४८ हजार ३०० हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के पेरणी झाली आहे. यंदा तब्बल ४८ टक्क्यांनी ज्वारीची लागवड माघारल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली. देशातील अनेक भागात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणी होत आहे. रब्बीसाठी पोषक वातावरण नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी न करण्यास पसंती दिली आहे. ज्वारी उत्पादक महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्यात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने पेरणी जवळपास ५४.५ टक्क्यांनी कमी झाली आहे, तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातही दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे. तेथे आतापर्यंत केवळ ५० टक्के परणी झाली. कर्नाटक हे देशातील क्रमांक एकचे ज्वारी उत्पादक राज्य आहे. येथे ज्वारी उत्पादक पट्ट्यात दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला. जमिनीत अार्द्रता नसल्याने पेरणीस योग्य स्थिती नाही. 

पेरण्या रखडल्या देशातील महत्त्वाच्या ज्वारी उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुष्काळी स्थिती असल्याने ज्वारीच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा नसल्याने रब्बी पेरणी रखडली आहे. त्याचा परिणाम एकूण देशातील ज्वारी पेरणीवर झाला. मोठा कोरडा काळ किंवा दुष्काळी स्थिती ज्वारी पिकासाठी पोषक नाही, तसेच यंदाच्या हंगामात पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांनी दिली.

दुष्काळाचा परिणाम महाराष्ट्र हे भरडधान्य उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. येथे जवळपास ५४.५ टक्के पेरणी कमी झाली आहे, तर कर्नाटक राज्यात ज्वारीची पेरणी ५० टक्के कमी झाली. या भागात यंदा सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच कर्नाटक सरकारनेही २३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com