agriculture news in Marathi jyotiba khete start Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक दाखल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास रविवार(ता. १६)पासून प्रारंभ झाला. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतून दीड लाखावर भाविक दर्शनासाठी आले. रविवारी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक, सालंकृत महापूजा तसेच धुपारती सोहळा झाला.
 

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास रविवार(ता. १६)पासून प्रारंभ झाला. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतून दीड लाखावर भाविक दर्शनासाठी आले. रविवारी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक, सालंकृत महापूजा तसेच धुपारती सोहळा झाला.
 

जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून पारंभ झाला. कुशिरे, पोहाळे गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून गेले. त्यांना जत्रेचे स्वरूप येते. पहाटेच्या प्रहरी हा डोंगर परिसर चांगभलंच्या गजराने जयघोषाने दुमदुमून गेला. कोल्हापुरातील भाविक पंचगंगा नदीपासून अनवाणी पायी चालत आले, तर पंढरपूर, बार्शी, बेळगाव, सांगली, सातारा या भागातील भाविक गायमुख तलाव मार्गे पायी आले. 

माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या रविवारी भाविक शक्यतो अनवाणी पायाने चालत येतात. यामध्ये महिला, वयोवृद्ध, चिमुकले, तरुण वर्गातील भाविकांची संख्या लक्षणीय असते. गर्दीमुळे संपूर्ण ज्योतिबा डोंगर गर्दीने फुलून जातो. या वेळी चांगभलंचा अखंड जयघोष होतो.

कोल्हापुरातील भाविक तर पंचगंगा नदी ते कुशिरे गायमुख तलाव मार्ग ज्योतिबा वर येतात. सांगली, सातारा, बेळगाव, पुणे मुंबई या भागातील भाविक गायमुख तलाव, पायरी रस्ता, दक्षिण दरवाजा मार्ग अनवाणी पायाने चालत जोतिबावर येतात.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...