agriculture news in marathi, jyotiba yatra, kolhapur, maharashtra | Agrowon

चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला ज्योतिबा डोंगर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर करत श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा वाडी रत्नागिरी येथे शुक्रवारी (ता. १९) उत्साहात पार पडली.

ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर करत श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा वाडी रत्नागिरी येथे शुक्रवारी (ता. १९) उत्साहात पार पडली.

रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे शासकीय पूजा, अभिषेक तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते झाल्यानंतर ज्योतिबाचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर आलेल्या भाविकांनी श्री दर्शन, दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक व सायंकाळी पालखीचे दर्शन घेऊन आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करून परतीचा मार्ग धरला.

शुक्रवारी सकाळपासूनच लाखो भाविकांनी ज्योतिबा डोंगराकडे जाणारे रस्ते ओसंडून वाहत होते. अवघा जोतिबा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. विविध वाद्यांच्या आवाजाने वातावरण भक्तिपूर्ण बनले. सासनकाठ्या धरून वाद्यांच्या तालात भाविक नृत्य करीत होते. एसटी, ट्रक, मोटारसायकल, बैलगाडी अशा वाहनाने आणि चालतदेखील आलेल्या भाविकांसाठी कोल्हापूर शहरातून ज्योतिबा डोंगराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार केले होते. मानाच्या सासनकाठीचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई, समितीचे सचिव विजय पोवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ज्योतिबा मंदिर परिसरास भेट दिली.

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...