सासनकाठी मिरवणूक १९ला १२ वाजताच

जोतिबा
जोतिबा

जोतिबा डोंगर, जि कोल्हापूर ः श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेत दिवसेंदिवस गर्दी वाढत असून ही गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी यंदा सासनकाठी मिरवणूक सोहळा शुक्रवारी (ता.१९) दुपारी बारा वाजताच सुरू करण्याची घोषणा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी येथे केली. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर सासनकाठीप्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.  श्री. देशमुख म्हणाले, की यात्रेत सासनकाठी प्रमुखांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी यात्रेस सहकार्य करणे गरजेचे आहे. भाविक कसा सुखरूप घरी जाईल याकडे त्यांनी पाहणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांनाच बदल स्वीकारावे लागतील. त्यामुळे या यात्रेत सुद्धा छोटी-मोठे बदल भाविकांनी स्वीकारावेत. सर्वांनी मिळून यात्रा चांगली पार पाडू या. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील म्हणाले, की सासनकाठीधारकांनी सासन काठीची उंची मर्यादित ठेवा. जादा उंचीमुळे काठीचा बॅलन्स सांभाळता येत नाही. परिणामी अपघात घडण्याची शक्‍यता आसते. देवस्थानचे सचिव विजय पोवार यांनी सासनकाठीधारकांनी दिलेल्या प्रश्नाला समाधानकारक अशी उत्तरे दिली. बैठकीत निनाम पाडळी सातारा, वळिवडे करवीर, कासेगाव सांगली, कोडोली बांबवडे, पलूस, दरवेश पाडळी, मनपाडळे, लादेवाडी, हुपरी या गावातील सासनकाठी प्रमुखांनी विविध सूचना मांडल्या.  बैठकीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे, सचिव विजय पवार, देवस्थान समितीचे सुदेश देशपांडे, सुजय पाटील, अधीक्षक महादेव दिंडे, कोडोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव कुमार झाडे उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com