काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून

खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा टिकून आहेत. किमान आठ हजार व कमाल नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बाजार समित्यांमध्ये खरेदीची कार्यवाही रखडत सुरू आहे
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून Kabuli gram rate Surviving in Khandesh
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून Kabuli gram rate Surviving in Khandesh

जळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा टिकून आहेत. किमान आठ हजार व कमाल नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बाजार समित्यांमध्ये खरेदीची कार्यवाही रखडत सुरू आहे. पण अनेक खरेदीदार थेट गावात किंवा जागेवर खरेदी करून घेत आहेत. काबुली हरभऱ्याची पेरणी सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती.

जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात ही पेरणी झाली होती. केळी बागांची काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पेरणी झाली. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतही पेरणी केली. यंदा उत्पादन एकरी साडेतीन ते चार क्विंटल आले आहे. उत्पादन कमी असतानाच सुरवातीला दर सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

बाजारातील आवक मार्चच्या सुरवातीला सुरू झाली. नंतर दरात सुधारणा होत गेली. सध्या किमान दर आठ हजार व कमाल दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल, असा आहे. कोरोनामुळे बाजार समित्यांमधील कार्यवाहीवर सर्वत्र परिणाम झाला आहे. परंतु शिरपूर, चोपडा भागातील खरेदीदार थेट जागेवरून हरभऱ्याची खरेदी करून घेत आहेत. गेल्या वर्षी काबुली हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल सात हजार रुपये, असे होते.

कोरोना व  लॉकडाउनचा फटका या हरभऱ्याच्या बाजाराला बसला होता. पण यंदा दर टिकून आहेत. यातच शासकीय हरभरा खरेदीला वेग आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय खरेदी जळगाव, धरणगावसह १४ केंद्रांत तर धुळे व नंदुरबारात आठ केंद्रात सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. यातील ३० टक्के शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची खरेदी पूर्ण झाली आहे. सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजार,   व्यापाऱ्यांना काबुली हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com