Agriculture news in marathi Kabuli gram rate Surviving in Khandesh | Agrowon

काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा टिकून आहेत. किमान आठ हजार व कमाल नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बाजार समित्यांमध्ये खरेदीची कार्यवाही रखडत सुरू आहे

जळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा टिकून आहेत. किमान आठ हजार व कमाल नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. बाजार समित्यांमध्ये खरेदीची कार्यवाही रखडत सुरू आहे. पण अनेक खरेदीदार थेट गावात किंवा जागेवर खरेदी करून घेत आहेत.
काबुली हरभऱ्याची पेरणी सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती.

जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात ही पेरणी झाली होती. केळी बागांची काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पेरणी झाली. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतही पेरणी केली. यंदा उत्पादन एकरी साडेतीन ते चार क्विंटल आले आहे. उत्पादन कमी असतानाच सुरवातीला दर सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

बाजारातील आवक मार्चच्या सुरवातीला सुरू झाली. नंतर दरात सुधारणा होत गेली. सध्या किमान दर आठ हजार व कमाल दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल, असा आहे. कोरोनामुळे बाजार समित्यांमधील कार्यवाहीवर सर्वत्र परिणाम झाला आहे. परंतु शिरपूर, चोपडा भागातील खरेदीदार थेट जागेवरून हरभऱ्याची खरेदी करून घेत आहेत. गेल्या वर्षी काबुली हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल सात हजार रुपये, असे होते.

कोरोना व  लॉकडाउनचा फटका या हरभऱ्याच्या बाजाराला बसला होता. पण यंदा दर टिकून आहेत. यातच शासकीय हरभरा खरेदीला वेग आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय खरेदी जळगाव, धरणगावसह १४ केंद्रांत तर धुळे व नंदुरबारात आठ केंद्रात सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. यातील ३० टक्के शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची खरेदी पूर्ण झाली आहे. सुमारे ३० हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजार,   व्यापाऱ्यांना काबुली हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.
 


इतर बाजारभाव बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात घेवडा १५०० ते ६५०० रुपयेसांगलीत प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये...
‘लॉकडाउन’चे निर्बंध शिथिल;  अकोल्यात... बोर्डी, जि. अकोला : कोरोनाची दुसरी लाट...
नगरला शेवगा, घेवड्याला चांगला दर; आवक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबांची आवक वाढली; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमना बाजार समितीत सोयाबीन दरातील...नागपूर : सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. कळमना...
राज्यात वांगी ५०० ते ४००० रुपये क्विंटलपुण्यात प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये...
पुण्यात भाजीपाल्याची आवक संतुलितपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात केळी ६०० ते १५०० रुपयेसांगलीत क्विंटलला १२५० ते १३५० रुपये ...
नगरमध्ये शेवग्यासह दोडका दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कळमण्यात मोसंबीला ५००० ते ६५०० रुपयेनागपूर : कळमना बाजार समितीत सद्यःस्थितीत मोसंबीची...
हिरवी मिरची, कोबी, मटारच्या दरात वाढ  पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात बटाटा ८०० ते १८०० रुपये क्विंटलपुण्यात प्रतिक्विंटलला १२०० ते १४०० रुपये...
नगरमध्ये घोसाळे, वांगी, कारल्याचे दर... नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक घटली...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलाव सुरू नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...