Agriculture news in marathi Kabuli gram Slight improvement in rates | Page 2 ||| Agrowon

काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 एप्रिल 2021

खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत. गेल्या दोन दिवसांत दरात क्विंटलमागे ६० ते ८० रुपयांची सुधारणा झाली आहे.  किमान ८ हजार ६० व कमाल ९ हजार ८० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

जळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत. गेल्या दोन दिवसांत दरात क्विंटलमागे ६० ते ८० रुपयांची सुधारणा झाली आहे.  किमान ८ हजार ६० व कमाल ९ हजार ८० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

कोरोना संकटामुळे चोपडा, अमळनेर आदी बाजार समित्यांमध्ये खरेदीची कार्यवाही रखडत सुरू आहे. पण अनेक खरेदीदार थेट गावात किंवा जागेवर खरेदी करून घेत आहेत. थेट खरेदी धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागात सुरू आहे. काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी आल्याने सुरुवातीपासून बाजारात आवक कमी होती. यामुळे दर टिकून राहीले. त्यात मार्चमध्ये कोरोनाची समस्या वाढताच बाजारातील लिलाव प्रक्रिया, आवक मध्यंतरी ठप्प झाली. अनेक निर्बंध आले, अशाच बाजारातील तेजी, मागणी लक्षात घेता अनेक मोठे व्यापारी एजंटच्या मदतीने हरभऱ्याची थेट खेडा किंवा गावात जाऊन खरेदी करीत आहेत. 

काबुली हरभऱ्याची पेरणी सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती. जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात ही पेरणी झाली होती. केळी बागांची काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पेरणी झाली. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतही पेरणी केली. यंदा उत्पादन एकरी साडेतीन ते चार क्विंटल आले आहे. उत्पादन कमी असतानाच सुरवातीला दर सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते. 

बाजारातील आवक मार्चच्या सुरवातीला सुरू झाली. नंतर दरात सुधारणा होत गेली. सध्या किमान दर ८ हजार ६० व कमाल दर ९ हजार ८० रुपये प्रति क्विंटल, असा आहे. कोरोनामुळे बाजार समित्यांमधील कार्यवाहीवर सर्वत्र परिणाम झाला आहे. परंतु शिरपूर, चोपडा भागातील खरेदीदार थेट जागेवरून हरभऱ्याची खरेदी करून घेत आहेत. 

या हरभऱ्याची मागणी मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी भागात आहे. शिरपूर, चोपडा, मध्य प्रदेशातील बडवानी येथील व्यापारी या हरभऱ्याची पाठवणूक पश्चिम, उत्तर भारतात करीत असल्याची माहिती मिळाली.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...