‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमक
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

सातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी बेकायदा साक्षीदार बनविण्याचा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. तसेच, या गुन्ह्याला एमपीआयडी कायद्याचे कलम तातडीने लावा, यासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी दोषींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नसल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली. 

कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात ७२ शेतकऱ्यांची सुमारे एक कोटी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये सागर खोत याच्या नावाचा सहा क्रमांकाचा आरोपी म्हणून समावेश होता; पण त्याच्यासह अन्य दोन लोकांची नावे राजकीय दबावापोटी संगणकीय चूक दाखवून आरोपीतून काढून साक्षीदार करण्याचा प्रकार पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 नावे वगळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच या गुन्ह्याला एमपीआयडी कायद्याची कलमे लावण्यात यावीत या मागण्या जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या. या भेटीत त्यांनी पोलिस ठाण्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या वेळी अर्जुन साळुंखे, दादासो यादव, देवानंद पाटील, धनंजय महामुलकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com