Agriculture news in Marathi, Kadaknath hence will inquire into allocation scheme : Vishwas Devkat | Agrowon

कडकनाथ कोंबडी वाटप योजनेची चौकशी करणार ः विश्‍वास देवकाते
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या कडकनाथ कोंबडी वाटप योजनेतील ९० टक्के कोंबड्या मेल्या आहेत. काही ठिकाणी अन्य जातीच्या कोंबड्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात गाजत असलेल्या कडकनाथ घोटाळ्यातील पुरवठादारांनी या पक्ष्यांचा पुरवठा केला होता का? कडकनाथ अंड्यांचे उत्पादन का झाले नाही? याची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या योजनेची चौकशी करणार असल्याची घोषणा अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केली. 

पुणे : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या कडकनाथ कोंबडी वाटप योजनेतील ९० टक्के कोंबड्या मेल्या आहेत. काही ठिकाणी अन्य जातीच्या कोंबड्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात गाजत असलेल्या कडकनाथ घोटाळ्यातील पुरवठादारांनी या पक्ष्यांचा पुरवठा केला होता का? कडकनाथ अंड्यांचे उत्पादन का झाले नाही? याची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या योजनेची चौकशी करणार असल्याची घोषणा अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केली. 

राज्यभरात कडकनाथ कोंबडी घोटाळा गाजत आहे. या पार्श्र्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या कडकनाथ कोंबड्यांचा विषय जिल्हा परिषदेत गाजला. शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनी ठेकेदारांच्या वेगळ्याच जातीच्या कोंबड्यांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला. सद्यस्थितीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक कोंबड्या मेल्या असून, अपेक्षेप्रमाणे अंड्यांचे उत्पादनही मिळाले नाही. त्यामुळे ही योजनाच अपयशी ठरली आहे. कडकनाथ घोटाळ्यातील पुरवठादारांनी जिल्हा परिषदेच्या लाभार्थ्यांना पक्ष्यांचा पुरवठा केला आहे का? याची माहिती सादर करण्याची मागणी करण्यात आली. 

भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी कडकनाथ कोंबड्यांची योजना एका वर्षात बंद करण्याचे कारण काय? ज्या लाभार्थ्यांना कोंबड्यांचे वाटप झाले, त्यांच्याकडे या कोंबड्या आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी केली. सभागृहातील अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या. यावर अध्यक्ष देवकाते यांनी राज्यात कडकनाथ कोंबडी घोटाळा गाजत असून, जिल्हा परिषदेने राबविलेल्या कडकनाथ कोंबडी पुरवठा योजनेची सखोल चौकशी केली जाईल, असे सभागृहाला सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...